lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

Decision to start government milk dairy in every village in the state | राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते राज्यातील शासकीय दूध डेअरीचा कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या हाती देणार आहेत.

राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते राज्यातील शासकीय दूध डेअरीचा कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या हाती देणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

अशोक डोंबाळे
सांगली : राज्यातील दुग्ध व्यवसाय वाढविणे आणि पशुपालकांना सक्षम करण्यासाठी महानंद डेअरीला ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासचे सचिव तुकाराम मुंढे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यातूनच त्यांनी राज्यात गाव तिथे शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच ते राज्यातील शासकीय दूध डेअरीचा कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या हाती देणार आहेत.

गुजरातमधील अमूलच्या प्रगतीच्या कथा येत असताना, महाराष्ट्रातही स्वतःचा ब्रँड असावा, अशी मागणी जोर धरू लागली. त्याला मराठी अस्मितेची किनार होती. त्यातून दि. १८ ऑगस्ट १९८३ मध्ये महानंद हा ब्रँड सुरू झाला.

सुरुवातीच्या ३५ वर्षांमध्ये या संस्थेने समाधानकारक प्रगती केली, परंतु त्यानंतर डेअरी क्षेत्रातील राजकीय हस्तक्षेपामुळे खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू झाला. महानंद दूध सहकारी संघांची शिखर संस्था असतानाही त्या छत्राखाली सर्व सहकारी दूध उत्पादकांनी येण्यास नकार दिला.

जिल्हा दूध संघांना राजकीय फायद्यासाठी स्वतःची जहागीरदारी टिकवायची होती. एनडीडीपीमार्फत आधुनिकीकरणासाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर करण्याकडेच सर्व दूध संघांचे लक्ष होते. त्यातून संचालकांच्या तिजोरी भरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले.

आताही अनेक सहकारी दूध संघांच्या ताब्यात मोक्याच्या जागा आहेत. पण शेतकऱ्यांच्या हितासाठी महानंद डेअरी आणि जिल्हास्तरीय शासकीय डेअरी वाचविण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महानंद आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात शासकीय दूध डेअरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठीच त्यांनी जिल्हास्तरीय शासकीय डेअरीचा सर्व कारभार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १ मे २०२४ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व सहकारी दूध संघ, खासगी डेअरींचे नियंत्रण जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडे असणार आहे.

व्हेटर्नरी क्लिनिकने एक उद्योजक बनवावा
नव्याने होणाऱ्या व्हेटर्नरी क्लिनिकमधील डॉक्टरने आपल्या परिसरातील एका पशुपालकास उद्योजक बनविण्यासाठी मार्गदर्शन करून उभा केले पाहिजे, अशा सूचना तुकाराम मुंढे यांनी पुणे येथील कार्यशाळेत दिल्या आहेत. मुंढे यांची कार्यशाळा झाल्यापासून जिल्हा पशुवैद्यकीय उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आळस झटकून कामाला लागले आहेत. पशुसंवर्धन विकास अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही त्यांनी कामाला लावले आहे

Web Title: Decision to start government milk dairy in every village in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.