Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस > किती पाणी प्यायल्यानंतर गाय किती देते दूध? गायीने जास्त पाणी पिण्यासाठी काय करावे?

किती पाणी प्यायल्यानंतर गाय किती देते दूध? गायीने जास्त पाणी पिण्यासाठी काय करावे?

cow milking water drinking water management in cattle and buffalo | किती पाणी प्यायल्यानंतर गाय किती देते दूध? गायीने जास्त पाणी पिण्यासाठी काय करावे?

किती पाणी प्यायल्यानंतर गाय किती देते दूध? गायीने जास्त पाणी पिण्यासाठी काय करावे?

पाणी पिण्याचा गायीच्या दुधावर होतो परिणाम!

पाणी पिण्याचा गायीच्या दुधावर होतो परिणाम!

दूध व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात. दर कमी मिळणे, फॅट कमी लागणे, दूध खराब होणे अशा गोष्टींसोबत गायी किंवा म्हशीने दूध कमी दिले तर शेतकऱ्यांना मोठा तोटा होतो. अशा वेळी जनावरांनी दूध जास्त देण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जातात. पण किती लीटर पाणी प्यायल्यानंतर जनावरे किती दूध देतात आणि जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी काय करावे यासंदर्भातील सल्ला पाहूयात...

दरम्यान, गाय किंवा म्हैस जेवढ्या प्रमाणात पाणी पित असते तेवढ्याच प्रमाणात दूध तयार होत असते. तर वेगवेगळ्या वातावरणात गायीने जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. एक लीटर दूध तयार करण्यासाठी जवळपास २० लीटर दूध गायीने पिणे गरजेचे असते. तर २० लीटर दूध गायीकडून अपेक्षित असेल तर १०० लीटर पाणी गायीने प्यायले पाहिजे. 

त्याचबरोबर एका गायीने खाल्लेला १२ किलो चारा पचवण्यसाठी ५० लीटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे एका गायीने किंवा म्हशीने एका दिवसांत जवळपास १५० लीटर पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून ती गाय सरासरी २० लिटरच्या आसपास दूध देईल. 

पाणी पिण्यासाठी काय करावे?
कोणत्याही जनावरांनी पाणी जास्त पिणे हे त्याच्या आरोग्यासाठी आणि शरिरासाठी चांगले असते. तर अनेक जनावरे वेळेवर पाणी पित नाहीत. तर काही जनावरे खूप कमी पाणी पितात. त्यामुळे त्यांचे दुधाचे उत्पादनही कमी होते. जनावरांनी जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी पाण्यामध्ये तुरटी फिरवावी. त्यानंतर पाणी स्वच्छ होते त्यामुळे जनावरे जास्त पाणी पितात. 

माहिती संदर्भ - डॉ. प्रशांत योगी (पशुवैद्यकीय आणि पशुव्यवस्थापन सल्लागार)

Web Title: cow milking water drinking water management in cattle and buffalo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.