Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी पर्यटन > उद्योगनिर्मिती ते इथेनॉलपर्यंत येत्या काळात बांबू लागवड फायदेशीर, शासनाकडून अनुदान....

उद्योगनिर्मिती ते इथेनॉलपर्यंत येत्या काळात बांबू लागवड फायदेशीर, शासनाकडून अनुदान....

From agriculture to industrialization as well as to maintain the balance of the environment, bamboo cultivation is beneficial | उद्योगनिर्मिती ते इथेनॉलपर्यंत येत्या काळात बांबू लागवड फायदेशीर, शासनाकडून अनुदान....

उद्योगनिर्मिती ते इथेनॉलपर्यंत येत्या काळात बांबू लागवड फायदेशीर, शासनाकडून अनुदान....

शेतीपासून उद्योगापर्यंत बांबू लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर असून असल्याचे सांगत बांबूची लागवड 25 हजार हेक्टरपर्यंत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

शेतीपासून उद्योगापर्यंत बांबू लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर असून असल्याचे सांगत बांबूची लागवड 25 हजार हेक्टरपर्यंत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...

शेअर :

Join us
Join usNext

शेतीपासून उद्योगापर्यंत बांबू लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर असून असल्याचे सांगत बांबूची लागवड 25 हजार हेक्टरपर्यंत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

सातारा जिल्ह्यातील वाई येथे बांबू लागवडीच्या पथदर्शी कार्यक्रमाचे त्यांनी उद्घाटन केले. तीन वर्षांसाठी असणाऱ्या बांबू लागवड मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना साडेतीन ते साडेचार लाख रुपये मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

बांबू लागवडीकरिता शेतकऱ्यांना अडीच वर्षात हेक्टरी साडेसात लाख रुपये मिळणार अशी ग्वाही दिली आहे. सध्या हेक्टरी साडेसहा ते सात लाख रुपये हे दिले जात असून त्यामध्ये बांबू लागवडीसाठी आवश्यक असणारी खड्डे ते बांबूची रोपे यासाठी  शासनाकडून अनुदान दिले जात आहे. 

येणाऱ्या काही वर्षांचा विचार केला तर बांबूची मागणी प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मागील प्रमुख कारण म्हणजे इथेनॉल निर्मिती. इथेनॉल निर्मितीला चालना देण्याकरिता बांबूची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर बांबूची लागवड केली तर येणाऱ्या काळात ती त्यांना फायदेशीर ठरणार आहे. 

तीन वर्षांच्या असणाऱ्या या मोहिमेंतर्गत बांबू लागवडीसाठी हेक्‍टरी साधारण साडेचार लाख रुपये शासनाकडून बांबू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला देण्यात येणार आहेत. नव्या संसदेतील फर्निचर हे बांबूचेच असल्याचे सांगत येणाऱ्या काळात बांबू पासून कोणकोणते उद्योग उभे राहू शकतील याविषयी त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

उंच सकल भागात असणाऱ्या जमिनीवर आपल्याला बांबूची लागवड करता येऊ शकते. यासाठी सातारा जिल्ह्यात येत्या सहा महिन्यात बांबू पासून फर्निचर बनवण्याचा उद्योग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बांबूच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना शेततळे बांधून देण्याचा निर्णयही घेण्यात येईल असे ते म्हणाले.

Web Title: From agriculture to industrialization as well as to maintain the balance of the environment, bamboo cultivation is beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.