Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी पर्यटन > Agro Tourism कृषी पर्यटन; हंगामी उत्पन्न व रोजगाराच्या संधी देणारा हुकमी व्यवसाय

Agro Tourism कृषी पर्यटन; हंगामी उत्पन्न व रोजगाराच्या संधी देणारा हुकमी व्यवसाय

Agro Tourism; assured business that provides seasonal income and employment opportunities | Agro Tourism कृषी पर्यटन; हंगामी उत्पन्न व रोजगाराच्या संधी देणारा हुकमी व्यवसाय

Agro Tourism कृषी पर्यटन; हंगामी उत्पन्न व रोजगाराच्या संधी देणारा हुकमी व्यवसाय

शहरातील रोजच्या गोंगाटापासून दूर मोकळी अन् शुद्ध हवा घेण्यासाठी लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. आणि ही एक मोठी संधी आहे.

शहरातील रोजच्या गोंगाटापासून दूर मोकळी अन् शुद्ध हवा घेण्यासाठी लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. आणि ही एक मोठी संधी आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पर्यटन हे जगभरात प्रसिद्ध असलेले सर्वाधिक वेगाने वाढणारे उद्योग क्षेत्र आहे. रोजगाराच्या संधी देतानाच जिज्ञासु लोकांना देशाची संस्कृती, सभ्यता आणि धार्मिक पैलू समजून घेण्यास मदत करते.

विशेष म्हणजे, अनेक देशांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत देखिल पर्यटन आहे.  यामुळे अलीकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या पर्यटनाकडे आकर्षित होत आहेत. विशेषतः कृषी पर्यटन ही नवी संकल्पना आज वेगाने वाढतेय,

कृषी पर्यटन म्हणजे काय?
शहरातील रोजच्या गोंगाटापासून दूर मोकळी अन् शुद्ध हवा घेण्यासाठी लोक कृषी पर्यटनाकडे वळत आहेत. हिरवीगार शेती, पक्ष्यांचा किलबिलाट, झाडे, प्राणी, शांत आणि प्रसन्न वातावरणात काही वेळ घालण्याचा सुखद अनुभव घेण्याकडे शहरी भागातील पर्यटक कृषी पर्यटनाला पसंती देत आहेत.

शेतातील पिके, चुलीवर बनवले जाणारे जेवण आणि राहायची सोय, आबालवृद्धांसह मुलांना खेळायला-बागडायला मोकळी जागा, ग्रामीण जीवनशैली, बैलगाडीचा प्रवास अशा गोष्टी कृषी पर्यटनामध्ये येतात.

देशात सर्वाधिक पर्यटक कोठे?
वैविध्यपूर्ण संस्कृती आणि समृद्ध इतिहास असलेल्या भारत देशात दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होतात. देशांतर्गत पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेले राज्य तामिळनाडू आहे. तर विदेशी पर्यटकांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे. परदेशातील पर्यटकांना देशातील ऐतिहासिक स्थळे, समाधिस्थळे, गडकिल्ले, सागरी किनारे खुणावत असतात.

काय आहेत नोकरीच्या संधी?
देशात लाखो परदेशी पर्यटक भेट देतात. या पर्यटकांना गाइडची आवश्यकता असते. तुम्हाला इंग्रजीसह फ्रेंच, जर्मन, चायनीज आदी भाषां अवगत असतील तर तुम्ही चांगले करिअर करु शकता. यामुळे परदेशातील पर्यटकांशी संवाद साधण्यास मदत होते. आपल्याला भाषेविषयी विशेष प्रेम असल्याने याचा मोठा फायदा पर्यटकांशी डील करताना होतो.

प्रवास व पर्यटन अभ्यासक्रम
-
ट्रॅव्हल अँड टुरिझम या क्षेत्रातील एम.ए. कोर्स पूर्ण केल्यास त्या उद्योगातील तुमचे ज्ञान आणि कौशल्ये वाढू शकतात.
- भारतातील पर्यटन हे उत्पन्न आणि रोजगार निर्मिती, दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत मानवी विकासाचे साधन म्हणून उदयास आले आहे. ते राष्ट्रीय जीडीपीच्या ६.२३ टक्के आणि एकूण रोजगारामध्ये ८.७८ टक्के योगदान देते.

कौशल्ये आत्मसात करा
• व्यावहारिक अनुभव: ट्रॅव्हल एजन्सी, एअरलाइन्स, हॉटेल्स किवा इतर पर्यटनसंबंधित व्यवसायांमध्ये इंटर्नशिप किया अयिक भूमिका मिळवण्यासाठी व्यावहारिक अनुभव आणि उद्योग एक्सपोजर मिळवा.
• नेटवर्किंग: फील्डमधील व्यावसायिकांशी कनेक्ट व्हा. उद्योगातील कार्यक्रमांना उपस्थित राहा आणि तुमचे नेटवर्क वाढविण्यासाठी संबंधित असोसिएशनमध्ये सामील व्हा. नेटवर्किंगमुळे अनेकदा नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात.
• विशेष प्रमाणपत्रे : प्रवास आणि पर्यटनाशी संबंधित अतिरिक्त प्रमाणपत्रे, जसे की टूर मार्गदर्शक प्रमाणपत्रे, भाषा प्रवीणता प्रमाणपत्रे मिळविण्याचा विचार करा.

संभाजी सोनकांबळे
उपसंपादक

Web Title: Agro Tourism; assured business that provides seasonal income and employment opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.