Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >ॲग्री प्रॉडक्ट्स > एका तासात एक क्विंटल सोयाबीनची सफाई व प्रतवारी करणारे फिरते यंत्र विकसित; जाणून घ्या सविस्तर

एका तासात एक क्विंटल सोयाबीनची सफाई व प्रतवारी करणारे फिरते यंत्र विकसित; जाणून घ्या सविस्तर

A rotating machine has been developed that cleans and sorts one quintal of soybeans in an hour; know the details | एका तासात एक क्विंटल सोयाबीनची सफाई व प्रतवारी करणारे फिरते यंत्र विकसित; जाणून घ्या सविस्तर

एका तासात एक क्विंटल सोयाबीनची सफाई व प्रतवारी करणारे फिरते यंत्र विकसित; जाणून घ्या सविस्तर

soybean cleaning & grading machine सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. भारतासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पीक आहे.

soybean cleaning & grading machine सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. भारतासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पीक आहे.

सध्या सोयाबीनकाढणीचा हंगाम सुरू आहे. भारतासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पीक आहे.

मात्र काढणीदरम्यान अनेकदा काही प्रमाणात सोयाबीनचे दाणे शेतात सांडतात आणि ते माती, दगड, पेंढा, पाने, गवत यांसोबत मिसळतात. विशेषतः विदर्भ प्रदेशात शेतकरी हे सांडलेले धान्य हाताने किंवा झाडूच्या सहाय्याने गोळा करतात.

यानंतर पारंपारिक हातचाळणी पद्धतीने त्याची स्वच्छता आणि दर्जानुसार वर्गवारी केली जाते. ही प्रक्रिया अत्यंत श्रमप्रधान, वेळखाऊ असून दर्जाच्या एकसंधतेस बाधक ठरते. परिणामी सोयाबीनचा अपव्यय वाढतो आणि बाजारात योग्य भाव मिळत नाही.

सध्या बाजारात अशा प्रकारची फिरती (मोबाईल) सफाई व प्रतवारी यंत्रे उपलब्ध नाहीत, ज्यांच्या माध्यमातून थेट शेतपातळीवर हे काम प्रभावीपणे करता येऊ शकते.

सध्या उपलब्ध बरीच यंत्रे स्थिर प्रकारची असून त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात धान्य हाताळण्याच्या ठिकाणीच केला जातो. त्यामुळे लघु, सीमांत शेतकऱ्यांना हलकी, स्थानांतरयोग्य यंत्रे उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता कमी होते आणि काढणीनंतरचा तोटा वाढतो.

या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन PDKV Akola डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कापणी पथात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात एक अत्यंत उपयुक्त, किफायतशीर आणि कार्यक्षम यंत्र विकसित करण्यात आले आहे.

'पं.दे.कृ.वि. मोबाईल सफाई ग्रेडिंग यंत्र' हे यंत्र विशेषतः लघु शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहे व गावपातळीवर सोयाबीनची प्राथमिक स्वच्छता व प्रतवारी करण्यास सक्षम आहे.

लहान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
◼️ हे यंत्र लहान शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्या शेताची मर्यादित क्षेत्रफळे व तुलनेने कमी उत्पादन लक्षात घेता, जमिनीवर पडून वाया जाणारे 'मातेरा सोयाबीन' हे त्यांच्या आर्थिक नुकसानीचे मुख्य कारण ठरते.
◼️ हे दाणे ते मजूर लावून गोळा करतात, ज्यासाठी खूप वेळ व पैसा खर्च होतो. अशा वेळी हे यंत्र शेतकऱ्यांसाठी मोठे सहाय्यक ठरते. या यंत्राच्या मदतीने मातीमिश्रित सोयाबीन खूपच कमी वेळात स्वच्छ करता येते. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते.

यंत्राच्या वापरामुळे मिळणारे फायदे
◼️ शेतातील मातेरा सोयाबीन सहज, जलद व कार्यक्षमतेने स्वच्छ करता येते.
◼️ इतर शेतकऱ्यांच्या सोयाबीनवरही भाडेतत्त्वावर प्रक्रिया करून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येते.
◼️ गुणवत्तावाढ झाल्यामुळे बाजारभाव चांगला मिळतो.
◼️ लघु शेतकरी व उत्पादक समूहांसाठी उत्तम साधन.

यंत्राची प्रमुख वैशिष्ट्ये
◼️ क्षमता :
 ९० ते १०० कि.ग्रॅ./तास (सोयाबीनसाठी)
◼️ ऊर्जास्रोत : ०.५ एच.पी. सिंगल फेज वीज मोटर
◼️ उत्पादन गुणोत्तर
सफाई कार्यक्षमता - सुमारे ९६%
प्रतवारी कार्यक्षमता - सुमारे ९५%

कार्यपद्धती
सोयाबीन हॉपरमधून टाकल्यावर ते कंपन करणाऱ्या चाळणी विभागाकडे जाते. यामध्ये तीन वेगवेगळ्या आकारांच्या चाळण्या असतात.
१) पहिली चाळणी - मोठा कचरा (मातीच्या गाठी, झाड, पेंढा इ.)
२) दुसरी चाळणी - शुद्ध, मध्यम आकाराचे दाणे.
३) तिसरी चाळणी - लहान दाणे
ब्लोअरद्वारे पेंढा, पाने, हलकी अपघटक सामग्री वेगळी होते. यंत्र लहान व पोर्टेबल असल्यामुळे एकाच व्यक्तीकडून चालवणे शक्य.

व्यवसाय संधी
◼️ सोयाबीन व्यतिरिक्त इतर कडधान्ये, धान्ये यासाठीही वापर शक्य.
◼️ गावपातळीवर प्रक्रिया करून विक्री करता येते.
◼️ ग्रामीण युवक व महिलांसाठी स्वयंरोजगार संधी.

प्रशिक्षण व संपर्क
या यंत्राच्या वापर, देखभाल, कार्यपद्धती, विपणन व व्यवसाय नियोजनासाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहेत.

इच्छुकांनी  कुठे संपर्क साधावा?
संशोधन अभियंता, कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला ४४४१०४
दूरध्वनी : ०७२४-२२५८२६६

- डॉ. प्रमोद बकाने, श्री. राजन बिसेन, डॉ. सुरेश काळबांडे, श्री. उदयकुमार खोब्रागडे
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

अधिक वाचा: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर

Web Title : मोबाइल सोयाबीन क्लीनर विकसित: एक घंटे में एक क्विंटल सफाई!

Web Summary : अकोला विश्वविद्यालय ने मोबाइल सोयाबीन क्लीनिंग मशीन विकसित की। 100 किलो/घंटा साफ करता है, पत्थर, मिट्टी अलग करता है और ग्रेडिंग करता है। छोटे किसानों को कचरा कम करके और बाजार मूल्य बढ़ाकर लाभ होता है। अन्य अनाजों के लिए अच्छा, ग्रामीण रोजगार सृजित करता है।

Web Title : Mobile Soybean Cleaner Developed: Cleans a Quintal Per Hour!

Web Summary : Akola University developed a mobile soybean cleaning machine. Cleans 100kg/hour, separates stones, soil, and grades. Benefits small farmers by reducing waste and improving market value. Good for other grains, creating rural jobs.