lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > भाजीपाल्याचा भाव उतरला, मग हे करा मिळेल डबल नफा

भाजीपाल्याचा भाव उतरला, मग हे करा मिळेल डबल नफा

The price of vegetables has come down, then do this and you will get double profit | भाजीपाल्याचा भाव उतरला, मग हे करा मिळेल डबल नफा

भाजीपाल्याचा भाव उतरला, मग हे करा मिळेल डबल नफा

सध्या वाळवलेली मेथीची भाजी बाजारात विकली जात आहे. वाळवलेल्या मेथीचे १०० ग्रॅम वजनाचे पाकीट १५ ते २० रुपयांना विकले जात आहे. त्याला आकर्षक पॅकिंग केलेले आहे आणि त्यावर कसुरी मेथी असे नाव आकर्षकपणे छापून त्याची विक्री केली जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी प्रक्रिया उद्योगाची चर्चा होत असताना त्यासाठी आवश्यक असणारे परवाने आणि यंत्रसामुग्री तसेच मार्केटिंग वगैरे शब्द वापरून शेतकर्‍यांना आपल्या लक्षावरून हटविले जाते जाते. परंतु अशा कोणत्याही गोष्टींची अडचण न येता आपण काही सोप्या प्रक्रिया करू शकतो. 

सध्या वाळवलेली मेथीची भाजी बाजारात विकली जात आहे. वाळवलेल्या मेथीचे १०० ग्रॅम वजनाचे पाकीट १५ ते २० रुपयांना विकले जात आहे. त्याला आकर्षक पॅकिंग केलेले आहे आणि त्यावर कसुरी मेथी असे नाव आकर्षकपणे छापून त्याची विक्री केली जात आहे.

काही धाब्यांवर ही कसुरी मेथी परोठ्यामध्ये घालायला वापरली जाते. या वाळवलेल्या पाल्याची भाजी केली तर ती ताज्या भाजीसारखीच होते. तिच्या चवीत काही फरक पडत नाही. कारण या पाल्यामधला पाण्याचा अंश काढलेला असतो. जोपर्यंत त्यात भरपूर पाणी असते तोपर्यंत तो पाला नासण्याची आणि कुजण्याची शक्यता असते. आपण त्यातले पाणी काढून टाकले की हा कोरडा पाला बरेच दिवस टिकवता येतो. तो वर्षभर सुद्धा चांगला राहतो.

आपण चहा पितो, ती चहाची पावडर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो चहाच्या झाडाचा वाळवलेला पालाच आहे. त्यामुळे आपल्या शेतामध्ये उगवणार्‍या कोण कोणत्या पालेभाज्या वाळवून नंतर वापरता येतात यावर आपण आपल्या शेतातच प्रयोग केले पाहिजेत आणि या पालेभाज्या अशा वाळवून नंतर योग्य वेळी वापरण्याची सवय लोकांना लावली पाहिजे.

असेच आपण सर्व पालेभाज्या नव्हे नव्हे तर फळभाज्या ही सुकवू शकतो. यासाठी काही शेतकऱ्यांनी घरगुती जुगाड करून सोलार ड्रायर बनविले आहेत, तसेच काही शेतकरीमहिला पारंपारिक पद्धतीने हरभरा भाजी वाळवतात. परंतु या सर्व भाज्यांचा रंग आणि चव चांगली व जास्त काळ टिकावी, एकाच वेळी जास्त प्रमाणात भाजीपाला सुकवता यावा यासाठी बाजारात आता विविध प्रकारचे आणि स्वस्त सोलार ड्रायर उपब्ध आहेत. त्याचाही तुम्ही भाजीपाला सुकविण्यासाठी चांगल्याप्रकारे वापर करू शकता.

सध्या महिला बचत गट यामध्ये अग्रेसर आहेत. परंतु अजूनही ते कसे वळवावे अशा यात शंका आहेत तर यात मोठ विज्ञान नसून जसे पारंपारिक वाळवण करत होतो तसेच पण त्यात बाहेरील कचरा अथवा अति प्रमाणत वाळल्यामुळे रंग व चव बदल याची काळजी घ्यायला हवी. यातून तुम्हाला चांगला नफा मिळवू शकतो व यात तुम्ही चांगला उद्योगही करू शकता.

Web Title: The price of vegetables has come down, then do this and you will get double profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.