Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर

Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर

Shevga Powder : How to make powder from drumstick? Cost of setting up the industry; Let's see in detail | Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर

Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर

Moringa Powder Business शेवगा (मोरिंगा) ही एक सुपरफूड भाजी मानली जाते, जी सामान्यतः दक्षिण भारतीय जेवणांमध्ये वापरली जाते. शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.

Moringa Powder Business शेवगा (मोरिंगा) ही एक सुपरफूड भाजी मानली जाते, जी सामान्यतः दक्षिण भारतीय जेवणांमध्ये वापरली जाते. शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.

शेअर :

Join us
Join usNext

शेवगा (मोरिंगा) ही एक सुपरफूड भाजी मानली जाते, जी सामान्यतः दक्षिण भारतीय जेवणांमध्ये वापरली जाते. शेवग्याची पाने, शेंगा, कोवळ्या फांद्या आणि बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.

Shevga Powder Business त्यापासून अनेक मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती केली जाते. शेवग्याच्या पानास पोषक तत्त्वांचा स्त्रोत म्हणून विशेष ओळख प्राप्त आहे.

शेवग्याच्या पानापासून पावडर तयार करण्याकरिता आवश्यक यंत्रसामग्री
१) पाने धुण्यासाठी वापरावयाचे यंत्र: शेवग्याची पाने ट्रेमध्ये घरगुती पध्दतीने किंवा यंत्राद्वारे धुतात.
२) सुकवणी यंत्र (Tray Dryer)

शेवगा पावडर प्रक्रिया टप्पे
१) सुरुवातीला शेवग्याच्या झाडावरुन निरोगी व स्वच्छ पाने काढली जातात.
२) काढणीनंतर पानांच्या ट्रे मधील काडी कचरा काढून पाने स्वच्छ केली जातात.
३) स्वच्छ केलेली पाने मिठाच्या पाण्याने व नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली जातात.
४) पाने धुतल्यानंतर पानांवर वाळविण्याची प्रक्रिया केली जाते.
५) पाने वाळविण्याच्या/सुकविण्याच्या ३ प्रक्रिया आहेत यांत्रिक पद्धतीने कोरडे करणे, ऊन्हात वाळवणे व घरगुती पद्धतीने खोलीत सुकविणे.
६) वाळवलेल्या पानांची मिक्सर किंवा पल्व्हरायझरमध्ये बारीक करून भुकटी केली जाते.
साधारणतः ५० किलो शेवग्याच्या पानापासून १२ ते १५ किलो पावडर मिळते.
७) तयार केलेली शेवग्याच्या पानांची पावडर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये किंवा पाऊचमध्ये भरली जाते व तिची कोरड्या ठिकाणी साठवणूक केली जाते. ज्यामुळे बॅक्टेरियाला प्रतिबंध होतो. अशी पावडर साधारणतः सहा महिन्यांपर्यंत टिकते.
८) पॅकींग केलेली पावडर उद्योगाच्या नावाचे लेबल लावून विक्रीस पाठवावी.
९) पॅकींगवर उत्पादन तारीख, आतील घटकद्रव्ये, कालबाह्य तारीख, विक्री किंमत इ. कायदेशीर बाबींचा उल्लेख असावा.

शेवगा पाने पावडर उद्योग उभारणी अंदाजित खर्च
१) पाने धुण्यासाठी वापरावयाचे यंत्र (ऐच्छिक): रु. ४०,०००/- ते ८०,०००/-
२) सुकवणी यंत्र: रु. ३०,०००/- ते १,००,०००/-
३) दळणी यंत्र: रु. ३०,०००/- ते १,१०,०००/-
४) चाळणी यंत्र: रु. ७०,०००/- ते १,५०,०००/-
५) पॅकींग मशीन: १५,०००/- ते ३५,०००/-
टिपः यंत्राच्या किंमती त्याच्या गुणवत्ता व क्षमतेनुसार बदलतील.

योजना व अर्थसहाय्य
- मोरिंगा पावडर उद्योग उभारणीकरीता शासनाच्या विविध योजनांमधून अर्थसहाय्य उपलब्ध आहे.
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक व गट लाभार्थीना भांडवली गुंतवणूकीसाठी एकूण पात्र प्रकल्प किंमतीच्या कमाल ३५% अधिकतम रु. १० लाखाच्या मर्यादेत बँक कर्जाशी निगडीत अर्थसहाय्य देय आहे.
- योजनेत यंत्रसामुग्री (Plant Machinery) आणि तांत्रिक बांधकामाचा (Technical Civil Work) समावेश आहे.

Moringa Powder शेवगा पाने पावडर वापर व मागणी
-
मोरिंगामधील पोषणतत्वांमुळे आधुनिक जीवनशैलीमध्ये मोरिंगा पावडरचे सेवन करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.
मोरिंगा पावडरचे प्रत्यक्ष किंवा कॅप्सूल/टॅबलेट स्परुपात सेवन केले जाते.
- सूपमध्ये निरनिराळ्या खाद्य पदार्थांमध्ये, पेयामध्ये, औषधे, सौंदर्य प्रसाधने इत्यादीमध्ये मोरिंगा पावडरचा वापर केला जातो.
- तसेच पशुखाद्यामध्येही मोरिंगा पावडरचा वापर केला जातो. एकूणच ग्राहकांकडून मोरिंगा पावडरला चांगली मागणी आहे.

श्रीम. ज्योती किसन जगताप
कृषी पर्यवेक्षक, कृषी प्रक्रिया
कृषी आयुक्तालय, पुणे

अधिक वाचा: Shevga Powder Business : शेवग्यापासून पावडर बनविणे प्रक्रिया व्यवसायात कशा आहेत संधी? वाचा सविस्तर

Web Title: Shevga Powder : How to make powder from drumstick? Cost of setting up the industry; Let's see in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.