Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Sugarcane Crushing : साखर उद्योगात दिलासादायक वाढ; राज्यात नफ्यातील कारखान्यांचा आकडा झपाट्याने वाढला

Sugarcane Crushing : साखर उद्योगात दिलासादायक वाढ; राज्यात नफ्यातील कारखान्यांचा आकडा झपाट्याने वाढला

latest news Sugarcane Crushing: A comforting growth in the sugar industry! The number of profitable factories in the state has increased rapidly. | Sugarcane Crushing : साखर उद्योगात दिलासादायक वाढ; राज्यात नफ्यातील कारखान्यांचा आकडा झपाट्याने वाढला

Sugarcane Crushing : साखर उद्योगात दिलासादायक वाढ; राज्यात नफ्यातील कारखान्यांचा आकडा झपाट्याने वाढला

Sugarcane Crushing : राज्यातील सहकारी साखर उद्योगाला पुन्हा उभारी मिळत असल्याचे संकेत स्पष्ट आहेत. सलग तोट्याचा सामना केल्यानंतर अनेक कारखान्यांनी उत्पादनक्षमता व आर्थिक शिस्त सुधारत नफ्यात पुनरागमन केले आहे. साखर आयुक्तालयाच्या नव्या अहवालानुसार, नफ्यातील कारखान्यांची संख्या तब्बल २८ वरून ३६ वर पोहोचली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा दिलासा ठरत असून, शेतकरी, कामगार वर्गामध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.(Sugarcane Crushing)

Sugarcane Crushing : राज्यातील सहकारी साखर उद्योगाला पुन्हा उभारी मिळत असल्याचे संकेत स्पष्ट आहेत. सलग तोट्याचा सामना केल्यानंतर अनेक कारखान्यांनी उत्पादनक्षमता व आर्थिक शिस्त सुधारत नफ्यात पुनरागमन केले आहे. साखर आयुक्तालयाच्या नव्या अहवालानुसार, नफ्यातील कारखान्यांची संख्या तब्बल २८ वरून ३६ वर पोहोचली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा मोठा दिलासा ठरत असून, शेतकरी, कामगार वर्गामध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.(Sugarcane Crushing)

संतोष वानखडे

राज्यातील सहकारी साखर उद्योगात अनेक वर्षांनी पुन्हा गोडवारूपी सकारात्मकता दिसू लागली आहे. सलग तोटा आणि वाढत्या आर्थिक अडचणीतून सावरत राज्यातील नफ्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. (Sugarcane Crushing)

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सन २०२२-२३ मध्ये नफ्यात असलेले २८ कारखाने आता २०२४-२५ मध्ये ३६ वर पोहोचले आहेत. (Sugarcane Crushing)

या वाढीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, उसापासून उपजीविका करणारे शेतकरी आणि कामगार वर्ग यांच्यासाठी मोठा दिलासा देणारे वातावरण तयार झाले आहे.(Sugarcane Crushing)

राज्यातील साखर उद्योगाचे सध्याचे चित्र

साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, १७२ नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने आहेत त्यापैकी १०४ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे.

२०२४-२५ मध्ये नफ्यातील कारखाने : ३६

तोट्यातील कारखाने : ५२ (मागील वर्षी ६२)

म्हणजेच, व्यवस्थापन सुधारणा, कामकाजातील पारदर्शकता, उत्पादनातील वाढ आणि इथेनॉल प्रकल्पाद्वारे मिळणारी अतिरिक्त कमाई यामुळे कारखान्यांच्या आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे स्पष्ट होते.

गतवर्षीच्या तुलनेत मोठी सुधारणा

साखर कारखान्यांची स्थिती मागील तीन वर्षांत कशी बदलली?

वर्षनोंदणीकृतउत्पादन सुरूनफ्यातीलतोट्यातील
२०२२-२३१७२१०६२८६२
२०२३-२४१७२१०१३१५२
२०२४-२५१७२१०४३६५२

ही आकडेवारी उद्योगात वाढता गतीमानता, व्यवस्थापनात्मक बदल आणि केंद्र-राज्य सरकारच्या विविध धोरणांचा सकारात्मक परिणाम दर्शवते.

साखर उद्योगाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार

साखर उद्योग हा महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, कामगार, वहनदार आणि मजुरांच्या उपजीविकेचा मजबूत स्रोत आहे.

प्रत्येक कारखान्यावर हजारो ऊस उत्पादक, ऊसतोड मजूर, ट्रान्सपोर्टर्स, स्थानिक व्यापारी यांच्या अवलंबून असतात. त्यामुळे नफ्यातील कारखान्यांची वाढ म्हणजे रोजगार वाढ, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे, आणि ग्रामीण बाजारात आर्थिक गती मिळते.

वाशिमच्या केशवनगर कारखान्याची प्रतिक्षा कायम

कधीकाळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील बालाजी सहकारी साखर कारखाना हा स्थानिकांना रोजगार आणि शेतीला दिशा देणारा प्रकल्प होता. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून तो बंद अवस्थेत आहे.

स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे की, केशवनगरचा साखर कारखाना पुन्हा सुरू व्हावा; त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे उत्पादन फायदेशीर ठरेल आणि स्थानिक रोजगार पुन्हा निर्माण होईल.  तोट्यातील कारखान्यांची संख्या कमी झाली आहे.

ही घसरण का झाली?

* उत्पादन खर्चावर नियंत्रण

* इथेनॉल प्रकल्पांमधून अतिरिक्त उत्पन्न

* गाळप कार्यक्षमता वाढविणे

* उपउत्पादने (वीज, दारू, कंपोस्ट) विक्री

कारखान्यांतील प्रशासनिक सुधारणा

यामुळे आर्थिक तोटा कमी होऊन कारखाने स्थिरतेकडे जात असल्याचे दिसते.

साखर उद्योगात सकारात्मक बदल

राज्यातील सहकारी साखर उद्योगाला पुन्हा उभारी मिळत आहे. नफ्यातील कारखान्यांची संख्या वाढणे, तोट्यातील कारखान्यांची संख्या घटणे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे मिळणारी कार्यक्षमता यामुळे येत्या काही वर्षांत महाराष्ट्रातील साखर उद्योग आणखी सक्षम होईल, अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Farmers Protest : 'कोयता बंद' आंदोलन सुरू; ऊसदरवाढ नाही? तर कारखाने बंद वाचा सविस्तर

Web Title : महाराष्ट्र चीनी उद्योग में राहत: लाभ वाले कारखानों में तेजी से वृद्धि

Web Summary : महाराष्ट्र का चीनी उद्योग पुनर्जीवित हो रहा है, लाभ कमाने वाली सहकारी फैक्ट्रियों की संख्या 28 से बढ़कर 36 हो गई है। बेहतर प्रबंधन, पारदर्शिता और इथेनॉल परियोजनाएं इस सकारात्मक बदलाव में योगदान करती हैं, जिससे किसानों और ग्रामीण अर्थव्यवस्था को लाभ हो रहा है। कई कारखाने अपनी वित्तीय स्थिति में सुधार देख रहे हैं।

Web Title : Maharashtra's Sugar Industry Sees Relief: Profit Factories Increase Rapidly

Web Summary : Maharashtra's sugar industry is reviving, with profitable cooperative factories increasing from 28 to 36. Improved management, transparency, and ethanol projects contribute to this positive shift, benefiting farmers and the rural economy. Many factories are seeing improvements in their financial situations.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.