नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील केजीएस शुगर कारखान्याच्या नव्या व्यवस्थापनाने काही निर्णय जाहीर केले आहे. १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ३१०० रुपये, १ ते १५ जानेवारी दरम्यान ३२०० रुपये, तर १५ जानेवारीनंतर ३३०० रुपये दर मिळणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून टप्प्याटप्प्याने प्रतिटन उसाला देण्यात येणाऱ्या भावाची घोषणा केजीएस शुगर कारखान्याचे चेअरमन संजय होळकर यांनी केली. बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ रविवार दि. ३० रोजी पार पडला.
केजीएस शुगर कारखान्या म्हणजे पिंपळगाव निपाणी (नाशिक) येथील केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड हा कारखाना होय. हा कारखाना सहा वर्षांहून अधिक काळ बंद होता, परंतु ऑक्टोबर २०२५ मध्ये नव्या मालकाच्या ताब्यात देऊन त्याचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.
