Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > Millet Milk : मिलेट मिल्क तयार करताना कुठली उपउत्पादने तयार होतात? वाचा सविस्तर 

Millet Milk : मिलेट मिल्क तयार करताना कुठली उपउत्पादने तयार होतात? वाचा सविस्तर 

Latest News by-products are produced during production of millet milk Read in detail | Millet Milk : मिलेट मिल्क तयार करताना कुठली उपउत्पादने तयार होतात? वाचा सविस्तर 

Millet Milk : मिलेट मिल्क तयार करताना कुठली उपउत्पादने तयार होतात? वाचा सविस्तर 

Millet Milk : मिलेट मिल्क तयार करताना तयार होणारी उपउत्पादनेही उपयुक्त असतात आणि त्यांचा पुनर्वापर करता येतो.

Millet Milk : मिलेट मिल्क तयार करताना तयार होणारी उपउत्पादनेही उपयुक्त असतात आणि त्यांचा पुनर्वापर करता येतो.

शेअर :

Join us
Join usNext

Millet Milk : मिलेट दूध हे पारंपारिक भरडधान्यापासून तयार होणारे एक आधुनिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक उत्पादन आहे. हे दूध विविध पारंपारिक व औद्योगिक पद्धतींनी तयार करता येते. मिलेट मिल्क तयार करताना तयार होणारी उपउत्पादनेही उपयुक्त असतात आणि त्यांचा पुनर्वापर करता येतो.

मिलेट्समध्ये आहारतंतू (डायटरी फायबर), कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम यासारखी आवश्यक खनिजे विपुल प्रमाणात असतात आणि हे तृणधान्य ग्लूटेन-मुक्त असतात. या भरड धान्यांचा एक नाविन्यपूर्ण उपयोग म्हणजे भरड धान्य किंवा मिलेट दूध जे भरड धान्यांपासून तयार केले जाते आणि गाई/म्हैशीच्या दुधाचा पर्याय म्हणून वापरले जाते.

मिलेट चोथा (Residue) : 
गाळणी प्रक्रियेनंतर उरलेला चोथा म्हणजे फायबरयुक्त, अन्नघटकांनी समृद्ध पदार्थ असतो. याचा वापर पोळी, भाकरी, बिस्कीट्स, केक, पिठात मिसळणे किंवा इतर बेकिंग प्रक्रियांसाठी करता येतो. त्यामुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य वाढते आणि अन्नाचा अपव्यय टाळता येतो.

भिजवलेले पाणी : 
काही प्रक्रियांमध्ये विशेषतः खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स यांची मात्रा वाढवण्यासाठी मिलेट भिजवताना वापरलेले पाणी पुन्हा दुधामध्ये मिसळले जाते. हे पाणी अन्नातील सेंद्रिय पदार्थ आणि पोषक घटक टिकवून ठेवण्यास मदत करते. या उपउत्पादनांचा योग्य उपयोग केल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक शाश्वत व पोषणक्षम बनते.

Web Title: Latest News by-products are produced during production of millet milk Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.