Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >कृषी प्रक्रिया > वर्षभर मागणी असलेल्या चिंचेच्या 'या' मूल्यवर्धित पदार्थांचा प्रक्रिया उद्योग उभारून कमवा आधिकाधिक नफा

वर्षभर मागणी असलेल्या चिंचेच्या 'या' मूल्यवर्धित पदार्थांचा प्रक्रिया उद्योग उभारून कमवा आधिकाधिक नफा

Earn extra profit by setting up a processing industry for tamarind 'this' value added products which are in demand throughout the year | वर्षभर मागणी असलेल्या चिंचेच्या 'या' मूल्यवर्धित पदार्थांचा प्रक्रिया उद्योग उभारून कमवा आधिकाधिक नफा

वर्षभर मागणी असलेल्या चिंचेच्या 'या' मूल्यवर्धित पदार्थांचा प्रक्रिया उद्योग उभारून कमवा आधिकाधिक नफा

Value Added Product From Tamarind : चिंचेचे झाड एक बहुउपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. चिंचेच्या प्रत्येक भागाचा उपयोग विविध पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. चिंच आपल्या दैनंदिन जीवनात विविध पदार्थांत वापरली जाते.

Value Added Product From Tamarind : चिंचेचे झाड एक बहुउपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. चिंचेच्या प्रत्येक भागाचा उपयोग विविध पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. चिंच आपल्या दैनंदिन जीवनात विविध पदार्थांत वापरली जाते.

शेअर :

Join us
Join usNext

चिंचेचे झाड एक बहुउपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. चिंचेच्या प्रत्येक भागाचा उपयोग विविध पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. चिंच आपल्या दैनंदिन जीवनात विविध पदार्थांत वापरली जाते.

चिंच केवळ चवीला चांगली नसून, आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. चिंचाचा वापर विविध उत्पादनांमध्ये केला जातो, त्यामध्ये फळांचे, रसाचे, पावडरचे आणि सिरपचे उत्पादन होतात. याच अनुषंगाने आज जाणून घेऊया चिंचाच्या मूल्यवर्धित पदार्थांबद्दल तपशील पाहूयात.

चिंचेच्या फळांचा वापर

चिंच मुख्यतः तिच्या फळांमुळे लोकप्रिय आहे. तिच्या फळांपासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. चिंच गोड आणि आंबट चवीचे असते, त्यामुळे ते चटणी, पन्हे, सरबत, भेळ आणि पाणीपुरी यांसारख्या पदार्थांमध्ये वापरले जाते. तसेच युरोप आणि अमेरिकेत चिंच फळांपासून आरोग्यदायी पेये बनविली जातात.

चिंचापासून सिरप तयार करणे

चिंचाच्या फळाचा वापर सिरप तयार करण्यासाठी होतो. यासाठी चिंचाच्या फळांच्या गरामध्ये मीठ मिसळून त्याचे लहान गोळे तयार करून सेंट्रिफ्युज केले जाते. त्यामध्ये २०-२४% गर असतो, तसेच ५६.५% साखर व ४३.८% रिड्युसिंग शुगर असते. याच मिश्रणातून सिरप तयार होते, ज्याचा वापर जॅम, जेली, आईस्क्रीम आणि थंड पेय तयार करण्यात केला जातो.

चिंचाचा रस आणि अर्क

चिंचाचा रस देखील एक महत्त्वाचा उत्पादन आहे. रस तयार करण्यासाठी, गरामध्ये निर्लोपीन मिसळून त्याला काही दिवस ठेवले जाते. त्यानंतर, त्याचे गाळून घेतले जाते आणि त्याची आम्लता ७५ ते ८०% ठेवली जाते. याच रसापासून अर्क तयार केला जातो. अर्काला चव आणि सुगंध ठेवण्यासाठी त्याची विशेष काळजी घेतली जाते. हा अर्क पुढे सरबत, सिरप किंवा शीतपेय बनवण्यासाठी वापरला जातो.

चिंचापासून शीतपेय तयार करणे

चिंचापासून शीतपेय तयार करण्यासाठी तिच्या गराचा वापर केला जातो. गराच्या मिश्रणात साखर, सायट्रिक आम्ल आणि सोडियम बेण्झोयेट मिसळून ते निर्जंतुकीकरण करून ८५% तापमानावर ठेवले जाते. तयार झालेले शीतपेय एका वर्षापर्यंत चांगल्या स्थितीत राहते. अशाप्रकारे चिंचापासून आरोग्यदायी आणि चवदार शीतपेय तयार केले जाते.

औषधी गुणधर्म

चिंच आपल्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. ती भूक वाढविण्यास मदत करते आणि श्रम, भ्रम, व ग्लानी दूर करते. चिंचेची कोवळी पाने शरीरासाठी उपयुक्त असतात आणि ती सूज दूर करण्यास मदत करते. उष्माघाताच्या परिस्थितीत चिंचाचे पन्हे किंवा सरबत शरीरासाठी फायदेशीर ठरते.

वरील विविध पर्यायांचा वापर करत मूल्यवर्धित पदार्थांच्या मदतीने चिंच उत्पादक शेतकरी प्रक्रिया उद्योग उभारून अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवू शकतात.

हेही वाचा : आवळ्याचे मूल्यवर्धन करून उभारा उद्योग; वाचा आवळ्याच्या विविध १५ उत्पादनाची सविस्तर माहिती

Web Title: Earn extra profit by setting up a processing industry for tamarind 'this' value added products which are in demand throughout the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.