Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 03:33 PM2024-05-14T15:33:37+5:302024-05-14T15:49:30+5:30

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi And Rahul Gandhi : नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश नक्कीच आम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि कोणतीही कमी राहू देणार नाही. यावेळी यूपीमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नाही, असं म्हटलं आहे.

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi Slams Rahul Gandhi Over kerala waynad | Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला

Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश नक्कीच आम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि कोणतीही कमी राहू देणार नाही. यावेळी यूपीमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नाही, असं म्हटलं आहे. राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर मोदी म्हणाले की, "हे कुटुंब महत्त्वाचं नाही. त्यांना (राहुल) वायनाडमधून का पळून जावं लागलं? त्यांनी पराभव पाहिला आहे."

"वायनाडमधून पळून गेल्यानंतर आणि रायबरेलीला येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी (राहुल गांधी) त्यांची भाषा आणि स्वर अतिशय धारदार केले आहेत आणि ते काहीही बोलत आहेत. केरळने त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. कदाचित केरळने त्यांना चांगलंच ओळखलं असावं. उत्तर प्रदेशच्या जनतेनेही त्यांना आता ओळखलं आहे". आजतकशी संवाद साधताना मोदींनी असं म्हटलं आहे. 

"उत्तर प्रदेशचे लोक अतिशय उदार स्वभावाचे लोक आहेत. उत्तर प्रदेशातील जनता आता घराणेशाही स्वीकारू शकत नाही.  यूपीच्या लोकांनी पाहिलं आहे की एक पर्यायी मॉडेल आहे जे उत्तर प्रदेशचे जीवन बदलत आहे. योगीजींच्या नेतृत्वाखाली गोष्टी घडल्या, बदल झाला आणि त्याचा परिणाम झाला."

"लोकांना माहीत आहे की येथे भाजपाचे सरकार असणे, दिल्लीत भाजपाचे सरकार असणे हे उत्तर प्रदेशचं भाग्य आहे. माझं भाग्य आहे की, मला प्रत्येक राज्यात अशी टीम मिळाली आहे, मग ते सत्तेत असो किंवा विरोधात, मुख्यमंत्री असो वा मंत्री, ते तत्वांसाठी असतात. आमचं सौभाग्य आहे की आमच्याकडे अशी शेकडो आश्वासक माणसं आहेत" असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Lok Sabha Elections 2024 Narendra Modi Slams Rahul Gandhi Over kerala waynad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.