उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 08:24 AM2024-05-15T08:24:43+5:302024-05-15T08:25:15+5:30

Loksabha Election - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. 

Loksabha Election 2024 - Uddhav Thackeray tried to cheat twice; Chief Minister Eknath Shinde's claim | उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

मुंबई - Eknath Shinde on Uddhav Thackeray ( Marathi News ) पंतप्रधानांसोबत दिल्लीत वैयक्तिक बैठक झाली, त्यात शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचं ठरलं होतं. आमदारांनीही भाजपासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु उद्धव ठाकरेंनी एकदा भाजपाला फसवलं, महायुतीला आणि राज्यातील जनतेला फसवलं आणि बाळासाहेबांच्या विचारांना सोडलं. त्यानंतर महाविकास आघाडीलाही फसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते, तेव्हा शरद पवारही नाराज झाले होते. तुम्ही एकदा फसवलं, दुसऱ्यांदा मविआला फसवण्याचा प्रयत्न केला. दोनदा फसवण्याचं काम केले. खुर्चीचा मोह सुटत नव्हता, त्यामुळे भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आणखी काही लोकांना गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकणे, २०-२५ आमदारांना फोडणे हे सगळं प्लॅनिंग होतं. फोडाफोडीच राजकारण हे तुमचं काम सुरूच होते. शिवसेनेचं आणि शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होते. बाळासाहेबांचे विचार सोडले. ५ वर्ष तुमची खुर्ची मजबूत राहिल यासाठी प्लॅनिंग करत होते असा आरोप उद्धव ठाकरेंवर लावले. 

तर मविआ उमेदवाराच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा पाहिला, १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उमेदवाराचा प्रचार करतोय. हे त्यांचे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व आहे. शेकडो मुंबईकरांचे बॉम्बस्फोटात प्राण गमावले. हेमंत करकरेंना कसाबनं मारलं नाही असा जावईशोध त्यांनी लावला. फारुख अब्दुल्ला म्हणतात, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे त्यांचे राष्ट्रीयत्व आहे असं सांगत या देशातील, राज्यातील जो देशभक्त मतदार आहे तो यांना २० तारखेला त्यांची जागा दाखवेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ABP माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

दरम्यान, कोविड काळात पीपीई किट घालून मी बाहेर लोकांमध्ये फिरत होतो. मग मला कितवा नंबर मिळाला पाहिजे. स्वत:ची स्वत: पाठ थोपटून घेत हे घरी बसले होते. कोविड काळात माणसं मरत होती आणि हे कोविड सेंटरच्या नावाखाली भ्रष्टाचार करत होते. ३०० ग्रॅम खिचडीचे पैसे घेऊन १०० ग्रॅम खिचडी लोकांना वाटत होते. डेडबॉडी ठाण्यात ६०० रुपये आणि मुंबईत ४ ते ५ हजार रुपयाला विकत घेतली जात होती. कोविड सेंटरमध्ये खोटे डॉक्टर, खोटे रुग्ण दाखवून पैसे लाटले. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. चौकशीचं काम सुरू आहे असंही एकनाथ शिंदे यांनी आरोप केला. 

Web Title: Loksabha Election 2024 - Uddhav Thackeray tried to cheat twice; Chief Minister Eknath Shinde's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.