लाइव न्यूज़
 • 08:26 PM

  अंध विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय क्रिकेटपटूंचा उद्या दुबईतील भारतीय दूतावासात होणार सन्मान.

 • 08:24 PM

  गॉड, सेक्स अँड ट्रुथ या राम गोपाल वर्माच्या आगामी चित्रपटाविरोधात आंधप्रदेशात विशाखापट्टणम येथे महिलांनी आंदोलन केले.

 • 07:59 PM

  घोटी (नाशिक)- डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे येथे एका नवजात अर्भकासह 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड.

 • 07:35 PM

  दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर महानाटय 'जाणता राजा'चे 6 ते 10 एप्रिल दरम्यान होणार प्रयोग.

 • 07:33 PM

  मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना गांधीनगर येथे भाजपा नेत्यांनी सन्मानित केले.

 • 06:47 PM

  वर्धा - हैद्राबाद मार्गावर भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला.

 • 06:35 PM

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अनेकदा वेळ मागून देखील अनीसला प्रतिसाद मिळत नाही - हमीद दाभोळकर.

 • 06:32 PM

  अंधांची पाचवी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारताने जिंकली, दोन विकेट राखून पाकिस्तानावर मात.

 • 06:19 PM

  वर्धा- हिंगणघाट येथे व्यावसायिकाची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या.

 • 05:52 PM

  या प्रकाराचा निषेध म्हणून जामनेर पालिकेसमोर मातंग समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

 • 05:52 PM

  सफाई कामगारास मुख्याधिका-यांनी अपशब्द वापरल्याची घटना शनिवारी सकाळी जामनेरात घडली.

 • 05:51 PM

  गडचिरोली- न्यायालयाच्या आदेशाने गडचिरोली नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्याची खुर्ची जप्त, कंत्राटदाराचे बिल न दिल्याचे प्रकरण.

 • 05:46 PM

  अकोला - महाबीज संचालक पदासाठी विदर्भ मतदार संघातून खासदार संजय धोत्रे विजयी, धोत्रे यांना 9406 तर प्रशांत गावंडे याना 3983 मते पडली.

 • 05:45 PM

  नंदुरबार - वस्तीशाळा शिक्षकांनी जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वाराला ठोकले टाळे.

 • 05:18 PM

  बलात्काराच्या प्रकरणांना प्रसारमाध्यम खळबळजनक बनवतात, हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच धक्कादायक विधान.

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या