चर्चगेट स्थानकात लोकल प्लॅटफॉर्मला धडकली

By admin | Published: June 28, 2015 12:00 AM2015-06-28T00:00:00+5:302015-06-28T00:00:00+5:30

या अपघातामुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

प्लॅटफॉर्मला धडकल्याने लोकलचेही मोठे नुकसान झाले आहे. रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून लोकल हटवण्याचे काम सुरू आहे.

या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

लोकल बफर एंडला धडकून प्लॅटफॉर्मवर चढली. त्यामुळे लोकलची ओव्हरहेड वायरही तुटली आहे.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर एक लोकल धडकल्याने अपघात झाला आहे.