... तर हे कलाकार झाले असते 'व्हिलन'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 03:48 PM2018-06-14T15:48:09+5:302018-06-14T15:48:09+5:30

'बाहुबली' या प्रचंड गाजलेल्या चित्रपटातील भल्लालदेवच्या भूमिकेसाठी सुरुवातीला जॉन अब्राहमला विचारण्यात आले होते. मात्र, त्याने नकार दिल्यानंतर ही भूमिका राणा डग्गुबतीच्या वाट्याला आली. त्याने या संधीचे अक्षरश: सोने केले.

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला 'डर' चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमात शाहरुखने राहुल मेहरा ही नकारात्मक भूमिका साकारली होती. पण सुरुवातीला या भूमिकेसाठी आमिर खानला विचारणा झाली होती. पण आमिर एक नायक म्हणून हिट होता म्हणूनच त्याने नकारात्मक भूमिका करायला नकार दिला होता.

'अंदाज अपना अपना' या सिनेमातील क्राइम मास्टर गोगो या भूमिकेसाठी सुरूवातीला टीनू आनंद यांना विचारण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे ही भूमिका शक्ती कपूर यांच्या वाट्याला आली.

मिस्टर इंडिया चित्रटातील प्रचंड गाजलेल्या मोगॅम्बोचा रोल सुरुवातीला अनुपम खेर यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, इतर प्रोजेक्टसमुळे अनुपम खेर यांनी हा चित्रपट नाकारला. त्यामुळे शेवटी अनिल कपूर यांनी या भूमिकेसाठी अमरिश पुरी यांचे नाव सुचवले होते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या शोलेतील गब्बरचा रोल सुरुवातीला डॅनी डेन्जोंगपा यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, पण इतर सिनेमांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्यामुळे डॅनी यांनी सिनेमाला नकार दिला. अखेर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी अमजद खान यांना विचारले. अमजद यांनी ही भूमिका अजरामर केली.