विरोधी पक्षनेते अजित पवारांच भाजपमध्ये स्वागत करणार का?, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 01:36 PM2023-04-17T13:36:07+5:302023-04-17T13:38:55+5:30

अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 

chandrashekhar bawankule reacts on whether NCP's Ajit Pawar will join BJP | विरोधी पक्षनेते अजित पवारांच भाजपमध्ये स्वागत करणार का?, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

विरोधी पक्षनेते अजित पवारांच भाजपमध्ये स्वागत करणार का?, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. काल नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुभ सभा झाली. या सभेला पवार उपस्थित होते, पण आज अजित पवार यांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. 

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश; पक्ष गळती सुरु?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये बुथमध्ये काम करणाऱ्यांचा आम्ही पक्ष प्रवेश करुन घेत आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा स्विकारली तर कोणाचही आम्ही पक्षात स्वागत करतो. आमच्याकडे पक्षाच्या विचारधारेवर काम करावे लागते. आमच्या पक्षाच्या विचारधारेवर काम करावे लागते. त्यामुळे कोणीही आमच्या पक्षात येऊन विचारधारेवर सहमत झाले तर आमची काही अडचण नाही, असंही बावनकुळे म्हणाले. 

'मी आज प्रशासक कारणासाठी दिल्लीत आलो आहे, आम्ही कोणत्याही राजकीय कामासाठी दिल्लीत आलेलो नाही. मला अजित पवार यांच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही. राजकारणात चर्चा खूप होत असतात, पण याच काही तथ्य नसते. भाजपमध्ये आम्ही प्रत्येक बुथवर पक्षप्रवेश घेत आहोत. हा महिना संपूर्ण पक्ष प्रवेशाचा आहे. आमचा संपूर्ण राज्यभर दौरा सुरू आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आम्ही पक्ष प्रवेश घेत आहोत. या महिनाभरात अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार आहेत, असंही बावनकुळे म्हणाले.  

Web Title: chandrashekhar bawankule reacts on whether NCP's Ajit Pawar will join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.