lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स 38 हजारी; निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी

सेन्सेक्स 38 हजारी; निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी

बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 10:37 AM2018-08-09T10:37:01+5:302018-08-09T10:40:55+5:30

बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात तेजी

sensex crossed 38000 for the first time in history nifty opens at fresh record high | सेन्सेक्स 38 हजारी; निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी

सेन्सेक्स 38 हजारी; निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी

मुंबई: शेअर बाजारानं आज नवा उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्सनं आज पहिल्यांदा 38 हजारांचा अंशांचा टप्पा ओलांडला. तर निफ्टीनंही 11,500 अशांचा टप्पा गाठला. सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी पहिल्यांदाच हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. बँकिंगसह जवळपास सर्वच कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत चांगली वाढ झाली आहे. 

आज सकाळी शेअर बाजारात व्यवहारांना सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीनं नवा विक्रम गाठला. सेन्सेक्सनं इतिहासात पहिल्यांदाच 38 हजारांचा, तर निफ्टीनं साडे अकरा हजार अंशांचा टप्पा ओलांडला. आयसीआयसीआयच्या शेअरच्या किमतीत चांगली वाढ झाल्यानं शेअर बाजारात तेजी पाहायला मिळते आहे. याशिवाय एसबीआय, आयटीसी, ऍक्सिस बँकेच्या शेअर्सचे दरही वधारले आहेत. एचपीसीएल, बीपीसीएल, हिंदाल्को, वेदांता यांचीही कामगिरी चांगली झाली आहे. मात्र लुपिन, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन, अशोक लेलँड, एनएमडीसीच्या शेअरचं मूल्य घसरलं आहे. 

Web Title: sensex crossed 38000 for the first time in history nifty opens at fresh record high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.