lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता काहीही तारण न ठेवता मिळणार एवढं कर्ज, RBIची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

आता काहीही तारण न ठेवता मिळणार एवढं कर्ज, RBIची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

केंद्रातल्या मोदी सरकारनंतर आता आरबीआयनंही शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 01:10 PM2019-02-07T13:10:19+5:302019-02-07T13:15:07+5:30

केंद्रातल्या मोदी सरकारनंतर आता आरबीआयनंही शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

latest rbi announce farmers package collateral free loan farmer income support scheme | आता काहीही तारण न ठेवता मिळणार एवढं कर्ज, RBIची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

आता काहीही तारण न ठेवता मिळणार एवढं कर्ज, RBIची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Highlightsकेंद्रातल्या मोदी सरकारनंतर आता आरबीआयनंही शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केलीआरबीआयच्या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना 1 लाखाऐवजी आता 1 लाख 60 हजार कर्ज मिळणार आहे. या कर्जासाठी शेतकऱ्याला काहीही तारण ठेवावं लागणार नाही.

नवी दिल्ली- केंद्रातल्या मोदी सरकारनंतर आता आरबीआयनंही शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना 1 लाखाऐवजी आता 1 लाख 60 हजार कर्ज मिळणार आहे. तसेच या कर्जासाठी शेतकऱ्याला काहीही तारण ठेवावं लागणार नाही. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी नियमांमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांना विना तारण कर्ज मिळणार असून, त्याची मर्यादा 60 हजार रुपयांनी वाढवल्याची माहितीही शक्तिकांता दास यांनी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 1.60 लाख रुपयांचं कर्ज काहीही तारण ठेवता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजारांची मदत केली जाणार आहे. पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती. परंतु या मदतीसाठी केंद्र सरकारनं काही अटीही ठेवल्या आहेत. जे खरोखरंच शेतकरी आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. 2015-16च्या कृषी जनगणनेत ज्यांची नावं आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत 31 मार्चपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा पहिला हफ्ता जमा होणार आहे.

केंद्र सरकारनं दावा केला आहे की, 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेवर सरकारकडून 75 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सरकारनं ही योजना कृषी कर्जमाफीनंतर आणली आहे. कृषी कर्जमाफीनं शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नसल्याचंही सरकारच्या लक्षात आलं आहे.

Web Title: latest rbi announce farmers package collateral free loan farmer income support scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.