lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोकरदारांनो ऑनलाईनद्वारे आयकर भरलाय....जरा थांबा....हे वाचा

नोकरदारांनो ऑनलाईनद्वारे आयकर भरलाय....जरा थांबा....हे वाचा

फॉर्ममध्ये गुपचुप बदल केल्याने पुन्हा माहिती भरावी लागण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 10:48 AM2018-08-11T10:48:15+5:302018-08-11T10:49:06+5:30

फॉर्ममध्ये गुपचुप बदल केल्याने पुन्हा माहिती भरावी लागण्याची शक्यता आहे.

Employers pay income tax online ... just wait .... read this | नोकरदारांनो ऑनलाईनद्वारे आयकर भरलाय....जरा थांबा....हे वाचा

नोकरदारांनो ऑनलाईनद्वारे आयकर भरलाय....जरा थांबा....हे वाचा

मुंबई : आयकर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली असताना ऑनलाईन फायलिंग करताना वेगळीच डोकेदुखी वाढली आहे. काही आठवडे शिल्लक असताना वेबसाईटवर आणखी बदल करण्यात आले असल्याने नोकरी करणाऱ्या करदात्यांना पुन्हा माहिती भरावी लागण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारच्या बदलांमुळे करदात्यांना पुन्हा माहिती भरावी लागते. तसेच यासाठी पुन्हा अधिकची माहिती गोळा करावी लागते. तसेच काही प्रकरणांमध्ये करदात्यांना सीएकडून आणखी स्पष्टीकरण विचारले जाण्याची शक्यता असते. 

नोकरी करणाऱ्या करदात्यांना आयकर फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती. मात्र, ती वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली. नोकरदारांकडून भरण्यात येणाऱ्या अर्जामध्ये आयटीआर-1 आणि आयटीआर-2 च्या आॅनलाईन व्हर्जनमध्ये दोनवेळा म्हणजेच 1 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला बदल करण्यात आले. 

या नव्या बदलांमध्ये उत्पन्नाचे अन्य स्त्रोत या रकान्यामध्ये अतिरिक्त माहिती मागविण्यात आली आहे. तसेच करदात्यांना सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारे व्याज, मुदतठेव, आयकर परताव्याचे व्याज आणि अन्य दुसऱ्या व्याजांबाबतची माहिती मागविण्यात आली आहे.
याचबरोबर कार्पोरेटसाठीच्या आयटीआर-7 मध्येही आतापर्यंत चारवेळा बदल केले आहेत. 

Web Title: Employers pay income tax online ... just wait .... read this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.