lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता हवेत अन् पाण्यातही चालणार BSNLचं इंटरनेट, सरकारनं दिला परवाना

आता हवेत अन् पाण्यातही चालणार BSNLचं इंटरनेट, सरकारनं दिला परवाना

भारत संचार निगम लिमिडेट (बीएसएनएल) कंपनीच्या इंटरनेट सेवेचा आनंद आता विमानात आणि समुद्रातील जहाजामध्ये  घेता येणार आहे.  यासाठी कंपनीला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परवाना दिला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 09:48 AM2019-04-04T09:48:10+5:302019-04-04T09:49:47+5:30

भारत संचार निगम लिमिडेट (बीएसएनएल) कंपनीच्या इंटरनेट सेवेचा आनंद आता विमानात आणि समुद्रातील जहाजामध्ये  घेता येणार आहे.  यासाठी कंपनीला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परवाना दिला आहे. 

bsnl gets license for high speed broadband from telecom ministry for in flight connectivity | आता हवेत अन् पाण्यातही चालणार BSNLचं इंटरनेट, सरकारनं दिला परवाना

आता हवेत अन् पाण्यातही चालणार BSNLचं इंटरनेट, सरकारनं दिला परवाना

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिडेट (बीएसएनएल) कंपनीच्या इंटरनेट सेवेचा आनंद आता विमानात आणि समुद्रातील जहाजामध्ये  घेता येणार आहे.  यासाठी कंपनीला केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने परवाना दिला आहे. 

बीएसएनएलची विदेशी भागीदार असलेल्या इनमारसॅटद्वारे ही सुविधा देणार आहे. भारतातून उड्डाण करणाऱ्या व भारतात येणाऱ्या सर्वच एअरलाइन्स कंपन्या या बीएसएनएलच्या इंटरनेटचा प्रयोग करणार आहेत. या एअरलाइन्सना बीएसएनएलच्या के केड बँड, स्विफ्ट ब्रॉडबँड आणि फ्लिट ब्रॉडबँड सेवा घेता येणार आहेत. ही सेवा समुद्रावरून उड्डाण करणाऱ्या विमानांमध्ये चालणार आहे. तसेच, समुद्रातील जहाजांमध्येही वापरता येणार आहे. 

इनमारसॅट आणि बीएसएनएल या वर्षीच्या शेवटपर्यंत इंटरनेटची सुविधा देणार असून, यासाठी कंपनीने पायाभूत सुविधा देण्याचे काम सुरू केले आहे. सध्या भारतात प्रवाशांना विमान प्रवासादरम्यान वायफाय सुविधा मिळत नाही. मात्र, लुफ्थान्सा, कतार एअरवेज आणि स्पाइसजेटने आपल्या विमानांमध्ये वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली आहे. 

चार कंपन्यांनी केला अर्ज
चार कंपन्यांनी या सुविधांसाठी अर्ज केला आहे. टाटा टेलिनेट, ह्युजेस इंडिया, सरकारी कंपनी बीएसएनएल आणि ओमिनी कनेक्ट यांचा समावेश आहे. आता सुरक्षा लक्षात घेऊन दूरसंचार विभाग त्याला परवानगी देणार आहे. 30 परदेशी विमान कंपन्या भारतीय हवाई हद्दीपासून अन्य देशात इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीची सुविधा देतात. यात एअर एशिया, एअर फ्रान्स, ब्रिटिश एअरवेजसह इतर कंपन्यांचा समावेश आहे. परंतु भारतीय हवाई हद्दीसंदर्भात नियमावली तयार करण्यात आली नसल्याने या सेवा भारतीय हवाई हद्दीत कार्यान्वित नाही आहेत. 
 

Web Title: bsnl gets license for high speed broadband from telecom ministry for in flight connectivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.