lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

Multibagger stock: कोरोना काळानंतर अनेक शेअर्सनं गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरनंही गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 03:37 PM2024-05-01T15:37:24+5:302024-05-01T15:37:40+5:30

Multibagger stock: कोरोना काळानंतर अनेक शेअर्सनं गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरनंही गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलंय.

multibagger-stock-tril-price-turns-6-rupees-to-625-rs-in-four-years-transformers-and-rectifiers-india-ltd-share-price | Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

Multibagger stock: कोरोना काळानंतर अनेक शेअर्सनं गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स (इंडिया) लिमिटेड (TRIL) हा असाच एक मल्टिबॅगर स्टॉक आहे. मंगळवारी या शेअरची जोरदार विक्री झाली असली तरी गेल्या काही वर्षांत या शेअरनं गुंतवणुकदारांना श्रीमंत केलं आहे. मे २०२० मध्ये एनएसईवर ६.३० रुपये प्रति शेअरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर या शेअरमध्ये रिकव्हरी दिसून आली. आता या शेअरची किंमत ६२६ रुपयांवर पोहोचली आहे. अशा प्रकारे जवळपास चार वर्षांत हा शेअर १०० पटीनं वाढलाय.
 

किती दिले रिटर्न?
 

एनएसईवर एका महिन्यात टीआरआयएलचा शेअर ४१५.५० रुपयांवरून ६२६.५० रुपयांवर गेला असून, गुंतवणूकदारांना ५० टक्के परतावा मिळाला आहे. हा मिडकॅप शेअर YTD कालावधीत सुमारे २३८ टक्क्यांनी वाढून ६२६.५० प्रति शेअरपर्यंत वाढला असून २०२४ मध्ये १६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत टीआरआयएलच्या शेअरची किंमत सुमारे १६१ रुपयांवरून ६२६.५० रुपयांवर पोहोचली. या कालावधीत या शेअरमध्ये सुमारे ३०० टक्के वाढ नोंदविण्यात आली. वर्षभरात हा मल्टिबॅगर शेअर ६७.३० वरून ६२६.५० रुपयांवर पोहोचला असून गुंतवणूकदारांना सुमारे ८५० टक्के परतावा मिळालाय.
 

त्याचप्रमाणे मे २०२० मध्ये टीआरआयएलच्या शेअरची किंमत ६.३० रुपये प्रति शेअरपर्यंत पोहोचली होती. हा शेअर आता ६२६.५० रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच मल्टीबॅगर शेअरनं गेल्या चार वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना १०० पट परतावा दिलाय.
 

गुंतवणूकदार कोट्यधीश
 

जर एखाद्या गुंतवणूकदारानं सहा महिन्यांपूर्वी टीआरआयएलच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ही रक्कम आता चार लाख रुपये झाली असती. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदारानं वर्षभरापूर्वी या मल्टिबॅगर शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आजपर्यंत या शेअरमध्ये गुंतवणूक ठेवली असती, तर त्याच्या एक लाखाचं मूल्य आज ९.५० लाख रुपये झालं असतं. कोविडच्या कालावधीत एखाद्या गुंतवणूकदारानं या मल्टीबॅगर शेअरमध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याची रक्कम १ कोटी रुपये झाली असती. कंपनीच्या या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ७६९.१० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ६३.०५ रुपये आहे.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: multibagger-stock-tril-price-turns-6-rupees-to-625-rs-in-four-years-transformers-and-rectifiers-india-ltd-share-price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.