समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 04:39 PM2022-12-09T16:39:01+5:302022-12-09T16:39:31+5:30

नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत.

Chief Minister Eknath Shinde said that samruddhi Highway will be a game changer. | समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत

समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत

Next

मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आज ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धीमहामार्ग लोकार्पण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.  

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा-दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत समृद्धी महामार्गाचे होणारे लोकार्पण हा राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदेंनी दिल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Chief Minister Eknath Shinde said that samruddhi Highway will be a game changer.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.