निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 

कर्णधार लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी शतकी भागीदारी करून LSG ला मोठी धावसंख्या उभारून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:23 PM2024-05-17T21:23:09+5:302024-05-17T21:30:45+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Nicholas Pooran ( 75) & KL Rahul ( 55) 109 runs partnership, team hattrick by Mumbai indians; Lucknow Super Giants set 215 runs target | निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 

निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024, MI vs LSG Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात फार चांगली झाली नव्हती आणि मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी त्यांचे ३ फलंदाज ६९ धावांवर माघारी पाठवले. पण, कर्णधार लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी शतकी भागीदारी करून LSG ला मोठी धावसंख्या उभारून दिली. निकोलसच्या विकेटनंतर मुंबईने सलग तीन विकेट्स घेऊन संघाची हॅटट्रिक पूर्ण केली. यात लोकेशहीची विकेट होती. 

 Arjun Tendulkar ने उगाच पंगा घेतला अन् मग मार्कस स्टॉयनिसने इंगा दाखवला, Video 


हार्दिकने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि नुवान तुषाराने पहिल्याच षटकात LSG ला धक्का दिला. देवदत्त पडिक्कल भोपळ्यावर पायचीत झाला. संधी मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या षटकात मार्कस स्टॉयनिसविरुद्ध चांगली आक्रमकता दाखवली. पण, त्यानंतर लखनौच्या पलंदाजाने मुंबईच्या अन्य गोलंदाजांची धुलाई केली. पण, सहाव्या षटकाता पियूष चावलाने MI ला ही विकेट मिळवून दिली. स्टॉयनिस २२ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने २८ धावांवर पायचीत झाला. पियूषच्या या षटकात लोकेश राहुलने दोन षटकार खेचले. दहाव्या षटकात चावलाने पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यात दीपक हुडाला फसवले ( ११) नेहाल वढेराने अफलातून झेल घेतला. LSG च्या १० षटकांत ३ बाद ६९ धावा झाल्या. 
 


लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी लखनौचा डाव सावरताना २२ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली. निकोलसने १३व्या षटकात २२ धावा चोपून मुंबईला बॅकफूटवर फेकले होते. लोकेशच्या २८ धावा होत्या, तेव्हा निकोलस ७ धावांवर खेळत होता. पण, त्यानंतर त्याने वेगाने धावा चोपून लोकेशला मागे टाकले. अर्जुन १५व्या षटकात पुन्हा गोलंदाजीला आला आणि निकोलसने ३ खणखणीत षटकार खेचून १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अर्जुनच्या पायात क्रॅम्प आल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले आणि त्याचे षटक नमन धीरने पूर्ण केले. त्या षटकात २९ धावा चोपल्या गेल्याने लखनौच्या १५ षटकांत ३ बाद १५९ धावांपर्यंत पोहोचवले. 

लोकेशनेही ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि सोबतच निकोलससोबत ३८ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. वादळी फटकेबाजी करणाऱ्या निकोलसला १७व्या षटकात तुषाराने माघारी पाठवले. निकोलसने २९ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांच्या आतषबाजीसह ७५ धावा केल्या आणि राहुलसह ४४ चेंडूंत १०९ धावा जोडल्या. पुढच्याच चेंडूवर अर्शद खान ( ०) झेलबाद झाला आणि १८व्या षटकात लोकेशही स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चावलाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ४१ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावा केल्या. या विकेटसह मुंबईने हॅटट्रिक पूर्ण केली. 

कृणाल पांड्या ( १२) व आयुष बदोनी ( २२) यांनी अखेरच्या षटकांत चांगली फलंदाजी करून संघाला ६ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: IPL 2024, MI vs LSG Live Marathi : Nicholas Pooran ( 75) & KL Rahul ( 55) 109 runs partnership, team hattrick by Mumbai indians; Lucknow Super Giants set 215 runs target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.