राज ठाकरे मनसैनिकांना काय संदेश देणार? त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 23:47 IST2018-03-17T23:43:30+5:302018-03-17T23:47:09+5:30
मुंबई : गुढी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी राजकीय गुढी उभारणार आहे. मनसे पाडवा मेळावा निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ...
मुंबई : गुढी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी राजकीय गुढी उभारणार आहे. मनसे पाडवा मेळावा निमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रसैनिकांना नेमका काय संदेश देतात त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य आहे. दरम्यान, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी तसेच भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कारभाराविरोधात राज ठाकरे बोलतील, अशी अपेक्षा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी लोकमत ऑनलाइनशी बोलताना व्यक्त केली आहे.