राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या हालचालींवर ड्रोनद्वारे पोलिसांची करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 12:18 IST2019-09-27T12:17:09+5:302019-09-27T12:18:07+5:30
मुंबई - शरद पवार हे दुपारी दोनच्या सुमारास सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार असल्याने पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ...
मुंबई - शरद पवार हे दुपारी दोनच्या सुमारास सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाणार असल्याने पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुमारे 1 हजार 500 पोलीस या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्याने या भागाला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक बारीकसारिक हालचालीवर लक्ष ठेवले आहे. ड्रोनच्या माध्यमातून येथील परिस्थितीचे चित्रिकरण करण्यात येत आहे.

















