Next

अंबानीच्या कार्यालयावर मोर्चा, बच्चू कडूंना कोणी अडवलं? Bacchu Kadu On Mukesh Ambani | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 03:22 PM2020-12-22T15:22:32+5:302020-12-22T15:23:05+5:30

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही रिलायन्सच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात रिलायन्सच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात होता. पण बच्चू कडू मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना नागपुरात रोखण्यात आलं होतं. बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत. वरिष्ठांच्या आदेशांनेच त्यांना रोखण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मात्र त्यांना अडवण्याचा हा आदेश कोणी दिला हे मात्र अद्याप समोर आलं नाही. सकाळी 9 वाजताच्या विमानाने बच्चू कडू मुंबईला रवाना होणार होते. पण त्यांना विश्रामगृहात अडवण्यात आलं. त्यानंतर सुमारे दोन ते अडीच तासांनी बच्चू कडू आंदोलनासाठी मुंबईत जाण्यासाठी निघाले. "शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याने मी सरकारचे आभार मानतो," अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी निघताना दिली. त्यामुळे मंत्रीमंडळातूनच त्यांच्या आंदोलनावर आक्षेप घेतला गेल्याचं सांगितलं जातंय.