Bharat Bandh: मनसैनिकांनी दिंडोशीतील भाजपा नगरसेवकाचे कार्यालय फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 15:42 IST2018-09-10T15:12:28+5:302018-09-10T15:42:55+5:30
दिंडोशीचे मनसे अध्यक्ष विजय व्होरा आणि त्यांच्या मनसैनिकांनी कार्यालयाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
मुंबई - भारत बंदला विरोध करणाऱ्या पी उत्तर वॉर्ड मधील दिंडोशी येथील प्रभाग क्रमांक 43 चे भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा यांचे मालाड पूर्व कुरार गावातील अनमोल हाईट्स या इमारतीतील कार्यालय मनसैनिकांनी फोडले. दिंडोशीचे मनसे अध्यक्ष विजय व्होरा आणि त्यांच्या मनसैनिकांनी कार्यालयाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.