Join us

'रमा राघव' नवीन मालिका या दिवशी येणार भेटीला, ही अभिनेत्री दिसणार रमाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:19 IST

Rama Raghav : 'रमा राघव' ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉस शोला प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तरीही या शोने राखीला आमंत्रित करून शोचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला. हा शो संपायला आता अवघे काही आठवडेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच नवीन मालिका दाखल होणार आहे. येत्या ९ जानेवारी पासून रात्री ९ वाजता रमा राघव (Rama Raghav) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रमा राघव ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक आहे.

पैजेवर जग जिंकणारी, मनाला पटेल तेच करणारी, बोल्ड अँड ब्युटीफुल रमा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत रमाच्या भूमिकेत ऐश्वर्या शेट्ये झळकणार आहे. तर सई रानडे, शीतल क्षीरसागर यांच्याही त्यात महत्वाच्या भूमिका असणार आहेत.

ऐश्वर्या शेट्ये हिने काही महिन्यांपूर्वी फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून काढता पाय घेतला होता. ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून सहाय्यक भूमिका साकारली. कलर्स मराठीने तिला आपल्या नवीन मालिकेतून मुख्य भूमिका साकारण्याची संधी दिली आहे. त्यामुळे ऐश्वर्यासाठी ही भूमिका तेवढीच खास ठरणार आहे.