Join us
Daily Top 2Weekly Top 5

“कुंकू, टिकली आणि टॅटू” मालिकेमध्ये रंगणार रमा – राजचा विवाहसोहळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 16:04 IST

“कुंकू, टिकली आणि टॅटू” हि मालिका काही दिवसांपूर्वीच  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळतं आहे. एकीकडे ...

“कुंकू, टिकली आणि टॅटू” हि मालिका काही दिवसांपूर्वीच  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळतं आहे. एकीकडे कुलकर्णी यांचे घरं जिथे विभा कुलकर्णी यांची भूमिका आहे कि, बाईन बाई सारखं वागावं”... आपल्या मर्यादेत रहावं ! विभा हे पात्र मालिकेमध्ये कुंकू हे प्रतिक दर्शवते आहे. घरातील सुनाही विभाच्या शब्दाबाहेर नाहीत, त्यांनी आखून दिलेल्या चौकटीतच जगत आहेत. हे घर अत्यंत पारंपरिक पण प्रसंगी कर्मठ आहे. तर दुसरीकडे रमा जी आजच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे जी टॅटू हे प्रतिक दर्शवते आहे. ही मालिका एका महत्वाच्या वळणावर येऊन पोहचली आहे जिथे विभा कुलकर्णी यांच्या मुलाचे म्हणजेच राज चे लग्न रमाशी होणार आहे. म्हणजेच आता टॅटू लग्न होऊन कुंकू म्हणजेच विभा कुलकर्णी यांच्या घरात येणार आहे. आता रमाची आधुनिक विचारसरणी आणि कुलकर्ण्यांचा परंपरावाद यांचा मेळ बसेल का ? हा विवाहसोहळा निर्विघ्नपणे पार पडेल का ? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असणार ज्याची उत्तरं त्याना लवकरच मिळणार आहेत.  रमा मोठ्या बहिणीच्या सुखासाठी तिच्या सुखाचा त्याग करून राजशी लग्न करण्यासाठी तयार झाली आहे. लग्न करण्यामागे रमाने घातलेली अट तिच्या वडीलांनी स्वीकारून तिच्या बहिणीचे लग्न तिला आवडणाऱ्या मुलाबरोबर लावून देण्यासाठी ते तयार झाले आहेत. विभा मुलाच्या प्रेमाखातर या लग्नासाठी तयार झाली आहे कारण आता लग्नासाठी नकार दिला तर मुलगा दुखावला जाईल. विभाला ही पूर्ण कल्पना आहे कि, रमा कुलकर्णींच्या घरामध्ये जास्त दिवस टिकणार नाही, रमाला संसार करण्यामध्ये अजिबात रस नाही. आता रमा – राजचं लग्न पारंपारिक पद्धतीने होणार कि आधुनिक पद्धतीने होणार ? या लग्नाचा घाट घातला तर आहे पण, जेंव्हा आजच्या काळातील मुलगी या पारंपारिक घरामध्ये येईल आणि जेंव्हा विभा आणि रमा या दोन परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या स्त्रिया एकमेकांसमोर येतील तेंव्हा घराचे घरपण, कौटुंबिक जिव्हाळा, एकमेकांबद्दलचे प्रेम या दोघी कशा टिकवून ठेवतील ? रमा आणि विभा कसा समतोल साधतील ? कुलकर्णी परिवार आणि विभा रमाला स्वीकारू शकतील का ? हे बघणे रंजक असणार आहे.