Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुला पाहते रे' मालिकेत नवा ट्विस्ट, ईशाला होणार स्वतःच्या अस्तित्वाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 18:34 IST

तुला पाहते रे मालिकेत रंजक वळणावर आली असून सध्या मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये जास्त आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुला पाहते रे मालिकेत रंजक वळणावर आली असून सध्या मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये जास्त आहे. सध्या मालिका फ्लॅशबॅकमध्ये गेली असून राजनंदिनीच्या काळातील घडामोडी प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये गजा पाटीलचा खरा चेहरा आता राजनंदिनीसमोर आल्यामुळे नवीन ट्विस्ट येणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

मागील भागांमध्ये विक्रांत राजनंदिनीवर वैतागतो. कारण राजनंदिनी सर्व प्रॉपर्टी आईसाहेब व जयदीपच्या नावावर करते. ती प्रॉपर्टी आपल्यावर नावावर करता येईल का, यासाठी गजा पाटील खूप प्रयत्न करतो. मात्र दादासाहेबांनी वकीलांना प्रॉपर्टीमधील कोणताच हिस्सा गजा पाटीलच्या नावावर कधीच कोणत्या मार्गाने करता येणार नाही, असा क्लॉज ठेवायला सांगतात, त्यामुळे गजा पाटीलचा हेतू साध्य होत नाही. त्यात राजनंदिनीला जालिंदर गजा पाटीलनेच दादासाहेबांच्या हत्येचा कट रचला असल्याची शंका येत असल्याचे सांगतो. पण, त्यावर राजनंदिनी विश्वास ठेवत नाही. 

जोगतिण राजनंदिनीला कोणावरही विश्वास ठेवू नकोस असे सांगते. त्यात ऑफिसमध्ये घडणाऱ्या काही घडामोडींवर आता गजाचे खरे रूप हळूहळू राजनंदिनीसमोर येत आहे. परंतु, गजा पाटीलचे पितळ उघड पाडण्याच्या आत गजा राजनंदिनीला छतावरून धक्का देऊन तिचा जीव घेताना या मालिकेच्या प्रोमोत पहायला मिळत आहे. आता त्याचा बदला घेण्यासाठी राजनंदिनी ईशाच्या रुपात आल्याचे दाखवले जाणार आहे. गजा पाटलाच्या भूतकाळात दडलेल्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख ईशाला होणार आहे. ईशाला भूतकाळातील हे रहस्य समजल्यावर ती पुढे काय पाऊल उचलेल? पुन्हा एकदा आपले खरे रूप जगासमोर येऊ नये यासाठी गजा पाटील ईशाचाही जीव घेणार का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा लवकरच होणार आहे. 

टॅग्स :तुला पाहते रेझी मराठी