Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जिवाची होतिया काहिली' मालिकेचे १०० भाग पूर्ण, सेट झालं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 17:20 IST

'जिवाची होतिया काहिली'मध्ये मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे.

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत  कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवलकर हिचा कानडी अंदाजसुद्धा  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. मालिका आता वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

 अर्जुन रेवथीच्या प्रेमात पडला असून रेवथीनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि मालिका वेगळे वळण घेते आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्यात चांगली मैत्री झाली असून अर्जुन आपले प्रेम व्यक्त करणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. नुकतीच मालिकेत ती मनीषाची. अभिनेत्री सिमरन  मनीषाच्या  व्यक्तिरेखेमध्ये दिसते आहे. . मनीषा आल्याबरोबरच सगळ्यांची मनं जिंकते आणि त्यामुळे रेवथीच्या मनात राग निर्माण होऊन अर्जुन आणि रेवथी यांच्यामध्ये भांडण होईल का, हे पाहणं उत्सुकतेचा ठरणार आहे.

दरम्यान मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले होत आहेत. त्या निमित्ताने मालिकेचा सेटवर संपूर्ण कलाकारांनी एकत्र येऊन जंगी  सेलिब्रेशन केले आहे. 

टॅग्स :सोनी मराठी