Worry about children's future! Poverty crisis on 12 million children due to corona! | चिंता मुलांच्या भविष्याची! कोरोनामुळे बाराशे लाख मुलांवर  गरिबीचं संकट!

चिंता मुलांच्या भविष्याची! कोरोनामुळे बाराशे लाख मुलांवर  गरिबीचं संकट!

- प्रतिनिधी

कोरोनानं प्रत्येकाचं जगणं अवघड केलंय. कोरोनाचा प्रत्येक क्षेत्रवर काय परिणाम होईल असे अंदाज वाचून भविष्यातील अवघड जगण्याची प्रत्येकानं तयारी केली आहे. पण आपल्या मुलाबाळांसाठी मात्र हे भविष्य सुकर असू देत असा आशावाद प्रत्येकानं आपल्या मनाच्या कोप:यात जपून ठेवलाय. पण युनिसेफचा नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल मात्र भविष्य काळातील मुलांच्या अवघड परिस्थितीची जाणीव करून देत आहे. या अहवालानुसार आशिया खंडातील 1200 लाख मुलं कोरोनामुळे नव्यानं गरिबीत ढकलली जाणार आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका आशियातील या आठ देशांतील 1200लाख मुलांचं भविष्य कोरोनामुळे धोक्यात येणार आहे. युनिसेफचा हा अहवाल म्हणतो, की मुळातच आशिया खंडात 2400 लाख मुलं दयनीय आरोग्यव्यवस्था, शिक्षण आणि स्वच्छतेचा अभाव, कामाच्या ठिकाणची निकृष्ट परिस्थिती यामुळे आधीच गरिबीचा सामना करत आहेत. पण कोरोनामुळे या संख्येत पुन्हा 12क्क् लाख मुलांची भर पडून हा आकडा आता 3600 लाख होण्याचा धोका आहे. या मुलांना गरिबीच्या खाईत ढकललं जाण्यापासून वाचवायचं असेल तर आताच पावलं उचलण्याची गरज या अहवालानं व्यक्त केली आहे. भारतासारख्या देशात कुपोषणाची समस्या आहे. पोषण अभियानाद्वारे त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण सध्या सर्व लक्ष कोरोनाकडे केंद्रित झालेलं असल्यामुळे पोषण आहार उपक्रमावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे मुलांच्या पोषणाचा विचार करता कोविड क्षेत्रतील अंगणवाडय़ांचं काम कसं सुरू होईल याकडे शासनानं लक्ष द्यायला हवं ही गरज हा अहवाल नोंदवतो. भारत आणि नेपाळमध्ये कोविड रुग्णांच्या विलगीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात शाळांचा वापर झाला. त्यामुळे त्या भागातील पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याबाबत संभ्रमित आहे. पालकांना आपली मुलं सुरक्षित आहेत याची खात्री देण्यासाठी अशा शाळांनी शाळा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण निजर्तुकीकरण करणं गरजेचं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुलं शाळा, शिक्षण यापासून दूर आहे. गरीब कुटुंबातील मुलं यापुढे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मोठय़ा प्रमाणात रोजगारात गुंतण्याची शक्यता आहे. असं झाल्यास त्यांची शाळा सुटेल. आणि त्यांचं आयुष्य आणखीनच कठीण होईल. भविष्यातील ही शक्यता लक्षात घेऊन युनिसेफने शाळा सुरू झाल्यावर सर्व मुलं शाळेत येत आहेत ना याकडे लक्ष द्यावं, अशी सूचना या अहवालात केली आहे. 
कोरोनामुळे मुलांच्या लसीकरणावर, पोषणावर  आणि इतर आवश्यक आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण आशियात पाच वर्ष किंवा त्याखालील मुलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. हा अहवाल पुढील एक वर्षात दक्षिण आशियात 8,81,000  मुलांच्या आणि 36,000 मातांच्या मृत्यूची भीती व्यक्त करतो. 
कोरोनामुळे जे स्थलांतरित मजूर आपापल्या गावात गेले तिथे त्यांचे रोजगाराचे हाल होतील. साहजिकच त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणावर होणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी शासन प्रशासनानं कंबर कसायला हवी, असं युनिसेफ चा हा अहवाल सांगतो. 
 

 

 

Web Title: Worry about children's future! Poverty crisis on 12 million children due to corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.