winter- home remedy- use Suntha for cold | थंडीत घरात सुंठ हवीच!- वाचा हे सुंठीचे 7 हमखास फायदे

थंडीत घरात सुंठ हवीच!- वाचा हे सुंठीचे 7 हमखास फायदे

ठळक मुद्देवारंवार पोट बिघडतं?- मग घरात सुंठ आहे ना!

-सखी ऑनलाइन टीम

आजीचा बटवा पूर्वी घरोघरी असायचा. घरगुती उपाय डॉक्टरकडे जाण्यापूर्वी करुन पाहिले जात. आता साध्यासुध्या आजारांसाठीही अनेकजण स्पेशालिस्ट गाठतात. डॉक्टरचा सल्ला हवाच, योग्य उपार व्हायला हवेत. मात्र काही किरकोळ आजारांवर पारंपरिक घरगुती उपचारही करुन पाहता येतात. जे आजीच्या बटव्यातून काढले तर आराम पडू शकतो. 
मुख्य म्हणजे पोटदुखी, डोकेदुखी यांच्यासाठी आपल्या मनानंच पेन किलर घेत बसण्यापेक्षा डॉक्टरकडे जाऊन योग्य निदान करावं. आणि काही घरगुती उपचारही करता येतात का हे पहावं.
आता साधं उदाहरण घ्या. जुलाब किंवा अतिसार होतात त्याचं. अनेकदा पोट बिघडतं, अपचन होतं. असा त्रासच झाला नाही अशी व्यक्ती अपवादच असेल. प्रत्येकला केव्हातरी अशा प्रकारचा त्रास झालेला असतो. विशेषतर्‍ घरात  लहान मुलं असलं की हा अनुभव अनेकवेळा येतो.  लहान मूल वा मोठी व्यक्ती कोणासही दिवसातून 1 ते 2 वेळा मलप्रवृत्ती होते. ती बांधून होते. ही सामान्य बाब आहे. पण यापेक्षा जास्तवेळा आणि पातळ संडासला होणं याला अतिसार असं म्हणतात. बाहेरचं खाणं, ¬तूच्या विरूध्द खाणं पिणं, दुधाचे किंवा जड पदार्थ अती प्रमाणात खाणं तर कधी अजीर्ण झाल्यामुळेही जुलाबाचा त्रास होतो. पण जुलाबाचा त्रास झाल्यास घाबरून न जाता योग्य घरगुती उपाय केल्यासही आराम पडू शकतो. 
हे करुन पहा.

1)  सगळ्यात उत्तम म्हणजे सुंठ. लहान मूल असेल तर सुंठ पाण्यात उगाळून ते चाटण दिवसातून दोन तीन वेळा द्यावं. मूल वयानं थोडं मोठं असल्यास सुंठीचं चूर्ण, तूप आणि साखर यांचं चाटण दिल्यास जुलाब थांबतात. 
2) अनेकांना वारंवार जुलाब किंवा आव होते. त्यांना पूर्वी सुंठीची कढी करून द्यायचे. जुलाबाचं प्रमाण जास्त असल्यास सुंठ आणि जायफळ एकत्र उगाळून दिल्यास त्वरीत उपयोग होतो.
3)  वारंवार पोट बिघडण्याची सवय असल्यास सकाळी 2 लिटर पाणी उकळून ठेवावं आणि ते उकळताना त्यात चिमुटभर सुंठीचं चूर्ण टाकावं  यामुळेही जुलाबाची तक्रार कमी होते.
4) पाण्यासारखे पातळ जुलाबावर  प्रभावी घरगुती इलाज म्हणजे डाळींबाची सालं.  आपण घरात डाळींब आणून ती खाऊन सालं टाकून देतो. ती सालं टाकून न देता वाळवून ठेवल्यास त्याचा प्रभावी वापर होतो. 
5) लहान बालक असेल तर डाळींबाची साल उगाळून अर्धा चमचा 2-3 वेळा दिल्यास तात्काळ जुलाब थांबतात. 
6)  व्यक्ती वयानं मोठी असल्यास सुंठ आणि डाळींब साल यांचा काढा करुन घ्यावा.  जुलाबावर त्वरीत आराम पडतो.
7) पूजेमध्ये नेहेमी वापरल्या जाणार्‍या बेलाच्या पानांचा रस वा त्यांचं चूर्ण किंवा बेलपानापासून बनवलेला बेलमुरंबा हीसुद्धा जुलाबावरील प्रभावी औषधं आहेत. 
 

Web Title: winter- home remedy- use Suntha for cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.