Will her share increase or decrease after the corona? | कोरोनानंतर  ‘ती’चा वाटा वाढेल की बुडेल?

कोरोनानंतर  ‘ती’चा वाटा वाढेल की बुडेल?

- शर्मिष्ठा भोसले

कोरोना विषाणूच्या संसर्गानं आपलं जगणंच बदलून टाकलंय. कुठलीही लहान-मोठी दैनंदिन गोष्ट यातून सुटू शकली नाहीय. संपूर्ण जग नोकरी, रोजगार, व्यवसाय यावर कोरोनाचा किती प्रभाव पडेल याचं गणीत करण्यात गुंतलंय. हातातलं काम जाण्यापासून नवीन संधी मिळण्यार्पयत अनेक गोष्टी घडत आहेत. घडणार आहेत. अर्थात यात स्त्रियांचा रोजगार आणि त्यांचं काम यांचाही विचार महत्त्वाचा आहे. कोरोनानंतरच्या उद्योगविश्वात, रोजगार विश्वात,बदलणा-या  कामाच्या स्वरूपात  महिलांसाठीच्या संधीचे अनेक अंदाज लावण्यात येत आहे.  आपल्या भारताच्या बाबत महिलांच्या रोजगाराबाबतचं चित्रं काय असेल?  ‘वर्क फ्रॉम होम’या येऊ घातलेल्या बदलामुळे स्त्रियांना नोकरी करणं सोपं होईल का? अर्धनागरी आणि ग्रामीण भागात काम करणा-या  स्त्रियांचं चित्रं कसं असेल  याचा अंदाज उद्योजक, व्यावसायिक , सामाजिक क्षेत्रतील् आणि महिला हक्कांसंबंधी काम करणा-या  कार्यकर्त्या  आणि तज्ज्ञांशी  बोलून घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक गोष्टी समोर आल्यात. अर्थात शहरातील किंवा ग्रामीण भागातील स्त्रियांसाठीच्या रोजगाराचं संपूर्ण चित्रं हे आश्वासक आणि स्वागतशील असेल असं नाही. यात नकारात्मक भाग आहेत तशी आव्हानंही आहेतच. 
 उद्योग क्षेत्र महिलांसाठी  किती स्वागतशील?  
कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर भारतीय उद्योगक्षेत्र महिलांसाठी किती स्वागतशील असेल? याबाबत सेटको स्पिंडल्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक, उद्योजक राजेश मंडलिक सांगतात,  ‘मला तरी असं वाटतं, की इंडस्ट्री महिलांना नोक:या  देण्यासाठी आता जास्त उत्सुक असेल.  आता महिलांनीच अधिकाधिक प्रमाणात पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी अर्थातच स्रियांना कुटुंबातून पाठिंबा मिळाला पाहिजे. कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित महिलांनाही मॉल्स, सिक्युरिटी एजन्सीज अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळतील.   पुरु षांच्या तुलनेत महिला या जास्त कार्यक्षम, विश्वासू असतात हे कायमच सिद्ध झालेलं आहे. पराराज्यांतील मजूर मोठ्या संख्येनं आपापल्या मूळ गावी परतलेत. कोरोनाचा भर ओसरल्यावर त्यातले सगळेच पुन्हा पुण्या-मुंबईत आणि इतर शहरांत दाखल होतील असं वाटत नाही. या संधी स्थानिक  पुरु षांसह महिलांनाही मिळू शकतात. महिलांना पोस्ट कोरोना रोजगाराच्या खूप संधी मिळतील. कारण समोर आलेल्या परिस्थितीशी महिला लगेचच जुळवून घेतात हे नेहमीच सिद्ध झालेलं आहे.’ 
 वर्क फ्रॉम होम संधीपेक्षा आव्हान मोठे
 येत्या काळातील वर्क फ्रॉम होमचं चित्रं कसं असेल याबाबत राजेश  मंडलिक म्हणतात,   ‘याबाबत बोलण्यासाठी मात्र काही काळ जाऊ द्यावा लागेल. ज्या वर्क फ्रॉम होम कंपन्या सध्या अस्तित्त्वात आहेत त्यांचं मॉनिटरिंग फार स्ट्रॉंग असतं. सिस्टम किती वाजता लॉग इन-लॉग आऊट केली, या दरम्यानच्या काळात तुमची कार्यक्षमता किती, कशी होती याची सगळी नोंद नीटपणो केली जाते. मात्र वर्क फ्रॉम होम असताना कामावर फोकस कसा करायचा हे सगळ्यांनाच मोठं आव्हान असणार आहे. विशेषत: स्त्रियांना तर घरात एकाच वेळी अनेक व्यवधानं सांभाळावी लागतात. त्यातून त्यांच्या कामाच्या दर्जा आणि क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्या हे आव्हान कसं पेलतात, कामाचं नियोजन कसं करतात यावरही अनेक गोष्टी ठरतील. या गोष्टींसाठीची यंत्रणा एकदा पक्की ठरली, की मग वर्क फ्रॉम होम सहज-सोपं आणि प्रभावी होऊ शकतं.
 तर सामाजिक सेविका आणि महिलांसाठीच्या  हक्कासाठी काम करणा:या कार्यकर्त्या  संयोगिता ढमढेरे म्हणतात, ‘महिलांचं एकूणच रोजगार क्षेत्रत येण्याचं प्रमाण भारतात कमी आहे. त्यातच त्यांना लग्न, बाळंतपण, मुलांचं संगोपन अशा अनेक टप्प्यांवर बहुतेकदा नोक-यांवर पाणी सोडावं लागतं. अगदी नव-याची बदली झाली तरी अनेक स्त्रिया नोकरी सोडतात. अशावेळी कोरोनासारख्या जगाला मोठ्या प्रमाणात प्रभावित करणा-या  आपत्तीत तर बहुतांश स्त्रियांना रोजगारावर पाणी सोडावं लागेल असं दिसतं. एरवीही स्त्रियांचा रोजगार, स्त्रिनं कमावतं असणं याला आपल्याकडे दुय्यमच महत्त्व दिलं जातं.
 ज्या स्त्रिया सध्या नोकरीत आहेत त्यांच्याच नोक:यांवर गदा येईल असं चित्रं आहे. अशावेळी नव्यानं स्त्रियांना रोजगार मिळतील याबाबत आशावाद कमीच.  मात्र  वर्क फ्रॉम होम  बाबतही हेच म्हणता येईल, की आपल्या कुटुंबात तिला किती सहकार्य मिळतं त्यावरच ती  वर्क फ्रॉम होम  किती चांगलं करू शकेल हे अवलंबून आहे. एरवीही आपल्या कार्यसंस्कृतीत व्यावसायिकतेचा अभाव दिसतो. आता वर्क फ्रॉम होममध्ये तर ती व्यावसायिकता जास्त लागेल. शिवाय ते तसं काम करण्यासाठी ज्या सोयी सुविधा लागतात त्याही संबंधित कंपनीकडून दिल्या गेल्या पाहिजेत. ज्या स्त्रिया विविध कारणांनी या सगळ्यांशी जुळवून घेऊ शकणार नाहीत, त्या बाहेर फेकल्या जातील. कारण असंघिटत क्षेत्रत काम करणा-या  स्त्रियांची संख्याच भारतात जास्त आहे. वर्क फ्रॉम होम स्त्रियांसाठी फायदेशीर असेलच. मात्र त्याचे परिणाम हातात येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. घरातून ऑफिसचं काम करण्यासाठी जे वातावरण लागतं ते भारतात तयार होण्यासाठी दीर्घ कालावधी लागेल, असं दिसतं. कोरोनाच्या काळात अनेक स्त्रियांना घरातून काम करावं  लागत आहे. अशा काळात घरगुती कामांची श्रमविभागणी पूर्वीच न झाल्यानं आताही स्थिती तशीच राहिली. घरकामाचा, घरातील वृद्ध आणि मुलांची काळजी घेण्याचा बोजा तर स्त्रियांवर पडतोच आहे, सोबत कार्यालयीन कामासाठी सतत उपलब्ध असण्याचा ताणही  त्यांच्यावर आहे. कार्यालयीन वर्क कल्चरमध्येही अजून वर्क फ्रॉम होम, त्याच्या शास्त्रीय पद्धती रु जलेल्या नसल्यानं ते काम तुकड्या-तुकड्यात कधीही कसेही करावं लागत असल्याचं अनेक स्त्रिया सांगतात.  लॉकडाऊनमुळे घरातले सगळे सदस्य सतत घरातच असतात. त्यांचं   हवं-नको पाहणं, त्यांची काळजी घेणं, स्वयंपाक, साफसफाई अशा जबाबदा-या  काही मोजक्याच घरांचा अपवाद वगळता स्त्रियांनाच पार पाडाव्या लागताहेत. सगळं कुटुंब जोवर स्त्रीसाठी अनुकूल नसेल तोवर तिला नोकरीसारखेच वर्क फ्रॉम होम सुद्धा अवघड, दमवणारंच असेल असं चित्र आहे.
 या महिलांनी काय करायचं?
 शिक्षिका, परिचारिका आणि घरकामगार अशा क्षेत्रत अजूनही महिलाच बहुसंख्य आहेत. ही क्षेत्रं अजूनही महिलांचीच समजली जातात. घरकामगार   महिलांच्या रोजगारावर तर कोरोनामुळे सध्या मोठं संकट आलेलं आहे. सध्याच अनेक घरांतून  घरकाम करणा:या स्त्रियांना सांगितलं गेलंय, की निदान दिवाळीपर्यंत तरी तुम्ही येऊ नका. त्यांना पगारही दिला जात नाहीय. यातल्या अनेकांचे नवरे मजुरी करतात, काही व्यसनी आहेत, काही जणींचे नवरे वारलेत. आपल्या घरातील गोष्टी सांभाळून करण्याचा हा रोजगार बायकांकडून या अवघड परिस्थितीत हिरावून घेतला गेला आहे. हा रोजगार   तर वर्क फ्रॉम होम करण्ं शक्य नाही. तिथे प्रत्यक्षच जावं लागतं. अशा वेळी त्यांनी काय करायचं हा प्रश्नच आहे.
 खेडी आणि अर्धनागरी भागात महिला बहुसंख्येनं असंघटीत क्षेत्रत   कार्यरत आहेत. लातूर जिल्हा परिषदेत माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या तृप्ती अंधारे सांगतात,   ‘अनेक घरकामगार  महिलांची उपासमार होताना मी पाहते आहे. काही अपवाद वगळता त्यांना काम बंद असल्याच्या काळात वेतन दिलं जात नाहीय. कोरोना संसर्ग ओसरून हे सगळं सुरळीत व्हायला आणि त्या भीतीतून बाहेर पडायला अजून किती काळ जाईल हे सांगता येत नाही. घरकामगार आणि त्यांच्या सारखी कामं करणा-या  स्त्रियांची अवस्था या काळात अवघड होणार आहे. पाळणाघरं चालवण्यासारखी कामं करणा-या  अनेक स्त्रियांचे रोजगारही या काळात हिरावले गेलेत. ग्रामीण भागातल्या  स्त्रियांच्या रोजगारात खूप काही फरक नाही पडणार. कारण तिथली कामं ही शेतातली आणि मजुरीची कामं असतात. सध्याही शेतातली कामं सुरूच आहेत. शहरांच्या    तुलनेत ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग  तितकासा तीव्र नाही. पावसाळ्याच्या तोंडावर त्यांची शेतातली कामं सुरू आहेत. शिक्षणक्षेत्रत खासगी आणि विनाअनुदानित क्षेत्रतील लोकांच्या नोक-या  मोठ्या संख्येनं जाण्याची भीती आहे. त्यात शिक्षिकाही आल्याच. अनेक उच्चशिक्षित पालक होम स्कुलिंग करतील. पण हे सगळ्यांनाच शक्य नाही. पोषण आहार बनवणा:या  स्त्रिया आणि  त्यांच्यासारख्या इतर क्षेत्रत काम करणा-या  महिलांच्या नोक-यांचा प्रश्न आहे.’
भारतासारख्या वैविध्यपूर्ण हवामान, प्रादेशिक रचना असलेल्या देशात आपण कोरोना नंतरच्या काळात कशा प्रकारची कार्यसंस्कृती अंमलात आणतो         त्यावर ब-याच गोष्टी ठरतील. एरवीच असमान वेतन, बाळंतपणाच्या रजेचे    हक्क नाकारले जाणो अशा विषमतेचा सामना करणा-या भारतीय स्त्नीला या कार्यसंस्कृतीत समान आणि न्याय्य स्थान मिळणासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील हे मात्र खरं. 

-------------------------------------------------------------------

रोजगारक्षेत्रतला  ‘ती’चा वाटा

1. सध्या भारतात संघटित आणि असंघटित क्षेत्रत काम करणा:या महिलांचं प्रमाण  ‘पिरिऑडिक लेबर फोर्स’च्या सर्वेक्षणानुसार 23.3 टक्के इतकं आहे.कॅनडा आणि चीन या देशांमधे  हेच प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 61  टक्के आहे. 
2. आपल्या देशात  बिहार राज्यात हे प्रमाण सर्वात कमी आहे.
3. स्त्रिया जसजशा शिक्षित होऊ लागल्या तसं त्यांच्यातलं रोजगाराचं प्रमाण वाढू लागलं. मात्र हे प्रमाण समाधानकारक नाही. ते असंघटीत क्षेत्रातच अधिक आहे. 
4. ग्रामीण भागात हे प्रमाण आणखी कमी असून   शहरातही जवळपास ते  स्थिरच आहे.
5. कोरोना विषाणू, लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणजे संघटित आणि असंघटित क्षेत्रतील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार गमवावा लागला असून यात वाढ होण्याचीच चिन्हं आहेत.
6. आपल्या देशात अजूनही पुरूषाकडे  कुटुंबाचा पालक  या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यामुळे त्याच्या कामाला महत्त्व. स्त्रीच्या कामाला महत्त्व कमी. 
7. या सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनामुळेही महिलांना कोरोनात्तर काळात रोजगार गमवावा लागेल.
8. ग्रामीण भागात स्त्रियांना कमी मजुरीवर जास्त वेळ राबवलं जाण्याचीही शक्यता आहे.


(लेखिका मुक्त पत्रकार आहे)

sharmishtha.2011@gmail.com

 

 

Web Title: Will her share increase or decrease after the corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.