Who is responsible for the anticipation disease? | आजाराच्या तर्काला जबाबदार कोण?

आजाराच्या तर्काला जबाबदार कोण?

- वैद्य सुविनय दामले

लॅबोरेटरीच्या रिपोर्ट्सवर आपण अवलंबून राहातो, त्या लॅब रिपोर्टच्या मागील छापील बाजू कधी वाचून बघितली आहे का? किंवा काहीवेळा रिपोर्टच्या खालीच अगदी बारीक अक्षरात लिहिलेलं असतं.
(सिगारेटच्या पाकिटावर कसं दिसेल न दिसेल अशा अक्षरात लिहिलेलं  असतं, ‘सिगारेट स्मोकिंग इज इन्ज्युरिअस टू हेल्थ’) मुद्दाम वाचा.  मला त्यांचं कायम  कौतुक वाटतं. सगळी कार्ड्स अगदी ओपन असतात. लपाछपीचा व्यवहार नाही. जे सत्य आहे ते अगदी लेखी लिहूनच देतात. नंतर मागाहून कोणी गडबड नको करायला, आम्हाला  सांगितलेच नाही, माहितीच नव्हतं वगैरे...
आपले जे रक्त, लघवी वगैरेचे रिपोर्ट्स दिले जातात, त्या रिपोर्ट्सवर जे काही लिहिलेलं असतं ते फक्त ती चिठी लिहून देणा:या डॉक्टरसाठीच असतं. त्याचा रुग्णाशी खरं तर काहीच संबंध असत नाही. रु ग्ण हा त्या कागदाचा केवळ वाहक असतो. तो रिपोर्ट काय आहे, कसा आहे, बरोबर आहे की नाही, हे त्या पॅथॉलॉजीच्या असिस्टंटनी कधीही रुग्णाला सांगायचं नसतं. सल्लेही द्यायचे नसतात. त्या कागदावर खाली काही वाक्यं असतात.. जसे,  The analysis results are only answer to corrosponding sample.The reported results is for information and for interpretation of referring doctor only.. याचा अर्थ असा होतो की, हा केवळ वैद्यकीय व्यावसायिकासाठी समजेल अशा वैद्यकीय भाषेत लिहिलेला कागद आहे. त्यात रुग्णांनी आपले डोके खर्च करू नये. त्याचा अभ्यास ज्यांना आहे, अशा वैद्यकीय जाणकारांनी  त्या रिपोर्टचे अर्थ नीट समजतील अशा भाषेत लावावेत, आणि आपल्या रुग्णांना सांगावेत. त्यासाठी योग्य तो मोबदला रुग्णांनी, त्यांना दिलेला असतो. (काही वाक्यांचे विस्तृत अर्थ खरं तर कंसातील आहेत; पण कंस न टाकता लिहिले आहेत.)
Referring doctor.......who understand the meaning of reporting units, reference ranges, and limitations of technologies should interpret the results. त्यांनीच रिपोर्टमधील निष्कर्षाचे अर्थ  लावावेत, ज्यांना या रिपोर्टमधील युनिट, रेफरन्स रेंज यांची पूर्ण माहिती, पूर्ण अभ्यास, ज्ञान आहे. तसेच रिपोर्ट करण्यासाठी जी मशीनरी वापरली गेली, त्या विशिष्ट कंपनीच्या मशीनरीचे, त्या मशीनमधील रिपोर्टिग करण्यासाठी वापरलेल्या पद्धतीमधील त्रुटींचे पूर्ण ज्ञान आहे त्यांनीच अंतिम निष्कर्षावर जे परिणाम होतात, ते समजून घेऊन तसे रु ग्णाला सांगितले जावे.’
  ‘आणि हे सर्व ज्यांना माहिती नाही, त्यांनी जर, चुकीच्या पद्धतीनं, आपल्या अंदाजानं हा रिपोर्ट वाचला आणि आपल्या पद्धतीनं, समजेनुसार जर तो समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि चुकून काही गोंधळ झाला तर, त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही!’ इतका स्वच्छ अर्थ होतो याचा. 
बरोबरच आहे ना. मोबाइल जरी आपल्या मालकीचा असला तरी, त्याचा बिघाड बघण्यासाठी, अतिहुशारी करून, नेट वरून वाचून, मोबाइल खोलून, दुरुस्ती करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का?
आणि इथे तर प्रत्यक्ष स्वत:च्या जिवाशी खेळ असतो. म्हणून पॅथॉलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टरदेखील या रिपोर्टचा योग्य तो अर्थ लावू शकत नाहीत, कारण   त्यांनी रु ग्णाला काहीवेळा बघितलेलं पण नसतं.
अशा अर्धवट ज्ञानावर आरोग्याचे निष्कर्ष काढणं तर फार धोक्याचं असतं.
पण  नेमकं हेच कुणी लक्षात घेत नाहीत.
रुग्णानं वैद्यकीयक्षेत्रत माहिती करून घेऊ नये,  केवळ एका यंत्रावर विश्वास ठेवला तर कदाचित यंत्र चुकू शकतं. कदाचित डॉक्टर चुकू शकतो. कदाचित लॅब रिपोर्टर चूक करू शकतो. कदाचित दुस:याचा रिपोर्ट आपल्या नावे फाडला जाऊ शकतो. कदाचित काहीवेळा वाढलेला किंवा सोकॉल्ड अँबनॉर्मल रिपोर्ट हा त्यावेळच्या शरीराची गरजदेखील असू शकते. ते शरीराला ठरवू देत. नाहीतर स्वत:ला नसलेल्या रोगाचं लेबल लावून फिरणं जास्त धोकादायक असतं.

(लेखक आयुर्वेदाचार्य आहेत.)

drsuvinay@gmail.com

 


 

Web Title: Who is responsible for the anticipation disease?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.