Who exactly eats your 'smart' phone battery? - how to save smart phone battery. | तुमच्या ‘स्मार्ट’फोनची बॅटरी नेमकं कोण खातं? - हे घ्या फोन बॅटरीचे तीन दुश्मन!
तुमच्या ‘स्मार्ट’फोनची बॅटरी नेमकं कोण खातं? - हे घ्या फोन बॅटरीचे तीन दुश्मन!

ठळक मुद्देफोन स्मार्ट, आपण स्मार्ट आणि बॅटरी ‘ढ’ असं का ?

-सखी ऑनलाईन टीम 

हल्ली कुणालाही विचारा, स्मार्टफोनविषयी काय तक्रार आहे, तर उत्तर एकच, बॅटरी फार लवकर उतरते. अनेजणी तर फोच चार्ज करायलाच विसरतात. बॅटरीच कधी डाऊन असते तर कधी नेटवर्क गुल असतो. कायम बॅटरीचा प्रश्न.आणि मग वाटतं की, हा फोन एवढी बॅटरी का खातो? आपण हातात घेतला, काही शूट करू किंवा व्हीडीओ पाहू असं ठरवलं की टुकटुक मेसेज येतोच, बॅटरी लो. ही अशी बॅटरी लो का होते?
आणि आपल्या फोनचं बॅटरी लाइफ खरंच वाढवता येऊ शकतं का?
फोन स्मार्ट, आपण स्मार्ट आणि बॅटरी ढ  असं का होतं?


फोनची बॅटरी खाणार्‍या तीन गोष्ट- स्क्रीन , डाटा, जीपीएस

अ‍ॅंड्रॉईड फोनमध्ये सगळ्यात जास्त बॅटरी खर्च होते ती या तीन गोंष्टींसाठी. त्यामुळे यांच्या काही सेटींग्ज बदलल्यावर बॅटरीलाईफमध्ये बर्‍यापैकी फरक जाणवेल.

मोबाईल स्क्रीन 

टचस्क्रीन हे स्मार्टफोनचे अविभाज्य अंग आहे.  बटनांचा कीपॅड असलेले फोन आता फारसे बनतच नाहीत.या स्क्रीनच्या टचसाठी आणि स्क्रि न ब्राईटनेस कायम ठेवण्यासाठी सर्वात जास्त बॅटरी जाते.
यावर ब्राईटनेस सेटींग ऑटो मोडवर ठेवली की फोनची बॅटरी जास्त् वापरली जाते. त्यापेक्षा मिनीममच्या जवळ पण आपल्या डोळ्यांना कम्फर्टेबल वाटेल अशा लेव्हलवर मॅन्युअली फोन  ठेवायचा. जेव्हा आपण अधिक प्रकाशात जातो तेव्हा तो गरज भासल्यास वाढवायचा. थोडं काम वाढेल पण एक्स्ट्रा ब्राईटनेसमुळे जाणारी बॅटरी वाचते.

डाटा
 डाटा तर फार महत्वाचा. नाही तर फोनचा वापर फक्त बोलण्यापुरता मर्यादित होतो.मात्र आपण कनेक्टेड असतो तेव्हा डाटा देवाणघेवाणीसाठी बॅटरी जातेच. आपण कमी कव्हरेज किंवा कव्हरेज नसलेल्या भागात असतो तेव्हा नेटवर्क शोधण्यासाठीतर जरा जास्तच बॅटरी जाते. त्यामुळे अगदीच गरज नसते तेव्हा मोबाईल नेटवर्क बंद करून टाका. बॅटरी वाचेल.

जीपीएस 
आपल्याला कळतही नाही पण हल्ली जीपीएस सतत ऑन असतं. मात्र सतत ते ऑन असण्याची काहीच गरज नाही.
प्रवासात मॅप आणि नेविगेशन वापरतांनाच फक्त जीपीएस सुरू केलेलं सर्वात चांगलं. एरव्ही ते बंद ठेवायचं, बॅटरी बचत होते.

Web Title: Who exactly eats your 'smart' phone battery? - how to save smart phone battery.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.