lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तुम्ही करत असलेलं डाएट हे फॅक्ट आहे की फॅड ? घ्या 4 रुल्स टेस्ट,राहा सेफ

तुम्ही करत असलेलं डाएट हे फॅक्ट आहे की फॅड ? घ्या 4 रुल्स टेस्ट,राहा सेफ

डाएट फॅड हे आपली ताकद आणि आपल्या वजनाच्या गुणोत्तरावर वाईट परिणाम करतं. हा परिणाम झाला की साहजिकच आपलं आरोग्य बिघडतं. म्हणून डाएट फॅड टाळणं गरजेचं. ते टाळण्यासाठी ते ओळखता येणं महत्त्वाचं. ऋजुता दिवेकर सांगताय डाएट फॅड ओळखण्याचे चार मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 07:56 PM2021-11-20T19:56:34+5:302021-11-20T20:09:37+5:30

डाएट फॅड हे आपली ताकद आणि आपल्या वजनाच्या गुणोत्तरावर वाईट परिणाम करतं. हा परिणाम झाला की साहजिकच आपलं आरोग्य बिघडतं. म्हणून डाएट फॅड टाळणं गरजेचं. ते टाळण्यासाठी ते ओळखता येणं महत्त्वाचं. ऋजुता दिवेकर सांगताय डाएट फॅड ओळखण्याचे चार मार्ग

Is your diet a fact or a fad? Take 4 Rules Test, Stay Safe! | तुम्ही करत असलेलं डाएट हे फॅक्ट आहे की फॅड ? घ्या 4 रुल्स टेस्ट,राहा सेफ

तुम्ही करत असलेलं डाएट हे फॅक्ट आहे की फॅड ? घ्या 4 रुल्स टेस्ट,राहा सेफ

Highlightsएक आठवडा, पंधरा दिवस अशा मर्यादित काळाचं डाएट आरोग्यासाठी फायदेशीर नसूच शकतं.डाएट फॅड आपल्या आहारातील घटकांना, पदार्थांना गुड फूड, बॅड फूड अशी लेबल लावून त्यांची विभागणी करतो.डाएट फॅड सतत कॅलरीज मोजा, किती खाल्लं ते मोजा, किती स्टेप्स चालल्या हे मोजा यावर भर देत राहातं.

 वजन कमी करण्यासाठी ‘डाएट’ हा सोपा मार्ग वाटतो. पण ‘डाएट’ हा वजन कमी करण्याचा मंत्र आरोग्यावर मात्र विपरित परिणाम करु शकतो. वजन कमी होणं राहातं दूर पण इतर अनेक समस्य उद्भवतात. या सर्वांच्या मागे आपला डाएट मंत्र आहे हे साधं आपल्या लक्षातही येत नाही.

हे असं कधी होतं?

जेव्हा डाएट हे फॅड होतं. जेव्हा डाएटचं फॅड फॅक्टसचा हात सोडतो. वजन कमी करण्याच्या आपल्या या प्रवासात एखादं डाएट आपल्याला आवडलं, आपल्याला ते इफेक्टिव्ह असेल असं वाटलं तर ते फॉलो करण्याआधी आपण स्वत:ला काही प्रश्न विचारणं आवश्यक आहे. हे डाएट फॅड आहे की लाइफ स्टाइल? आपल्या आहारातून एखादा पदार्थ कायमचा वगळून टाकला तर खरंच वजन कमी होतं? एक आठवड्याचं डाएट, पंधरा दिवसांचं डाएट, महिन्याभराचं डाएट फॉलो करुन वजन कमी करता येतं? कमी केलेलं वजन तेवढंच नियंत्रित ठेवता येतं? या प्रश्नांची उत्तरं कोणतंही डाएट फॉलो करण्याआधी मिळवणं आवश्यक आहे. ही उत्तरं मिळत नसतील तर अमूक तमूक डाएटचं फॅड सोडलेलंच बरं.

Image: Google

आपण फॉलो करतो ते डाएट फॅड आहे का? हे ओळखता यायला हवं. प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या फॅड डाएटच्या मागे न पळण्याचा महत्त्वाचा सल्ला देतात. त्या म्हणतात या फॅड डाएटमुळे फायदा आपला कधीच होत नाही. विशिष्ट ,व्यक्ती, एजन्सी त्यांच्या फायद्यासाठी डाएट फॅडचं खूळ काढून त्यांचं उखळ पांढरं करुन घेतात आणि आपण ते डाएट फॉलो करणारे या डाएटला कंटाळून दुसर्‍या अमूक तमूक डाएट फॅडच्या मागे लागतो.
ऋजुता दिवेकर म्हणतात कोणतंही डाएट हे फॅड नसलं पाहिजे. एक आठवडा, पंधरा दिवस अशा मर्यादित काळाचं डाएट आरोग्यासाठी फायदेशीर नसूच शकतं. डाएट म्हणजे केवळ आहार नसतो. तर डाएट म्हणजे आहारशैली. त्यात आपला देश, आपली संस्कृती, आपला प्रदेश, आपल्याकडचं हवामान, आपल्या खाण्यापिण्याशी निगडित चालीरिती, परंपरा, स्थानिक संस्कृती यांचा समावेश असतो. ही आहाराशैली आपल्या जीवनशैलीचं प्रतिबिंब असतं. आपण फॉलो करत असलेल्या डाएटमधून फॅड डोकावते की जीवनशैली हे बघणं आवश्यक आहे. यासोबतच ऋजुता दिवेकर फॅड डाएट ओळखण्याचे चार मंत्रही सांगतात.

फॅड डाएट कसं ओळखायचं?

डाएट फॅड हे आपली ताकद आणि आपल्या वजनाच्या गुणोत्तरावर वाईट परिणाम करतं. हा परिणाम झाला की साहजिकच आपलं आरोग्य बिघडतं. म्हणून डाएट फॅड टाळणं गरजेचं. ते टाळण्यासाठी ते ओळखता येणं महत्त्वाचं.

Image: Google

1. हे गूड फूड ते बॅड फूड

डाएट फॅड आपल्याला अमूक एक आहारातला घटक वजा करायला लावतो. त्याच्याविषयी आपल्या मनात भीती घातली जाते. साधारणत: कबरेदकं आणि साखर याबद्दल हे प्रामुख्यानं आढळतं. प्रथिनं मिळवण्यासाठी अमूक एकच घटक तुम्ही आहारात घ्या असं सांगितलं जातं. पण कोणताही एकच एक आहारीय घटक आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यास पुरेसं नसतं. हे डाएट आहारातील पदार्थांना गूड फूड आणि बॅड फूडमधे विभागतं. सध्याच्या डाएट फॅडमधे प्रथिनं आणि चांगले फॅटस गूड फूड मधे येतात आणि बॅड फूडमधे साखर आणि कर्बोदकांना टाकलं जातं. जेव्हा आपण पदार्थांकडे प्रथिनं, कर्बोदकं, फॅटस याच चष्म्याने बघतात तेव्हा तुम्ही ‘न्यूट्रिशनिझम’ला पांठिबा देतात. आपण पाहातो कोणताही इझमच्या मागे लागणं हे फायद्याचं नसतं. हे इझम भेद निर्माण करतात. एक विशिष्ट पध्दतीनं विचार करायला, जगायला शिकवतात. तसाचं हा न्यूट्रिशनिझम आहे जो एक विशिष्ट पध्दतीचाच आहार घ्यायला भाग पाडतो, आग्रह धरतो. हा एक प्रकारचा अन्याय आहे.

आपण जेव्हा पदार्थांना गुड फूड आणि बॅड फूडमधे विभागतो तेव्हा आपण आपल्या सामान्य ज्ञानाला धुडकावून लावतो. ते आपल्यावर ठसवतात की आपल्या आहारात आपलं वातावरण, आपल्या स्वयंपाकघरातील चालीरिती, संस्कृती यांचं काहीच महत्त्व नाही, काहीच संबंध नाही.लिंबू सरबत पिल्यानंतर कोणालाही छान ताजं तवानं वाटतं. थंडीत गाजराचा हलवा हा आरोग्यास पौष्टिकच असतो, दिवाळीत नारळाचे गोड पदार्थ जिभेला, मनाला आनंद देतात. वरण भात चांगली झोप लागण्यास नेहमीच मदत करतो. त्यामुळे अमूकच एक पदार्थ आरोग्यासाठी चांगला, वजन कमी करण्यासाठे उपयुक्त असं नसतं. आपलं डाएट , आहारशैली ही जेव्हा सामान्य ज्ञान, स्वयंपाकघरातील चालीरिती, आपलं स्थानिक वातावरण आणि संस्कृतीला महत्त्व देणार असेल तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं तसेच ते आपल्या पर्यावरणासाठीही चांगलं असतं.

2. पावडर खा- काढा प्या!

डाएट फॅड ओळखण्याचा दुसरा मार्ग म्हणजे हे डाएट आपल्या संस्कृतीशी अनुरुप आहे का? ते नसेल तर ते फॅड आहे हे समजावं. कारण डाएट फॅड हे आपल्याच संस्कृतीतला एक घटक उचलून त्यालाचं जास्त बढवून चढवून त्याचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवतात.  अमूक गोष्टींच्या पिल्स खा, पावडर खा असं आपल्यावर ठसवतं. अमूक फळाची पावडर खाल्ली, अमूक एका मसाल्याच्या घटकाचा अर्क/ काढा प्यायला तर आपलं पचन चांगलं होईल, बॉडी डीटॉक्स होईल , वजन कमी होईल असं सांगितलं जातं तेव्हा ते फॅड समजावं. आठवड्यातून/ पंधरवाड्यातून एखादा उपवास शरीरास आवश्यक असतो. त्याचा फायदा होतो. पण डाएट फॅडमधे रोजच एक वेळ उपवास करायला सांगितलं जात असेल तर ते चुकीचं आहे. त्याने पचनसंस्थेला आराम वगैरे काही मिळत नाही. उलट अशक्तपणा येतो, शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. हळद ही स्वयंपाकात वापरण्याचे पध्दत पण डाएट फॅड असेल तर हळदीच्या गोळ्या खा, हळदीचे शॉटस प्या, प्रत्येक गोष्टीत अगदी पुडिंगमधेही हळद टाकून खा असं सांगितलं जातं. हे चुकीचं आहे.

Image: Google

3. सर्व काही मोजून मापून

डाएट फॅड ओळखण्याची तिसरी पध्दत म्हणजे ते तुम्हाल प्रत्येक गोष्टी मोजून मापून खायला लावतं. तुम्ही पनीर किती खाल्लं, मटार किती खाल्ले, तुमच्या पोटात तेल तूप किती गेलं या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवायला सांगतं. सतत डोक्यात आकडे फिरत राहातात. हे डाएट फॅड आहे असं समजावं. स्वयंपाक ही कला आहे. सर्जनशील काम आहे. असं कॅलरीज, ग्रॅममधे मोजून टाकण्याची आपल्याकडे पध्दतच नाही. चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, चवीपुरती मीठ, साखर, मूठभर शेंगदाणे या अशाच पध्दतीने आपण स्वयंपाक करत असतो. स्वयंपाकात आपण आजी, आई, सासू यांच्या पध्दती फॉलो करतो. मोजमाप नाही. स्वयंपाक करताना सतत मोजमाप करुन स्वयंपाक केल्यास आपण फक्त आकडे मोजतच राहातो , आनंद गमावतो आणि दुखी होत राहतो. त्यामुळे हे फॅड आहे हे समजावं. हे असं डाएट फॉलो करुन आपण काय कमावतो तर असमाधान, दु:ख, अनारोग्य आणि अवेळी म्हातारपण.

4. आपल्या डाएटचा आपल्याच लोकांना त्रास 

अमूक एक डाएट करुन जर आपल्या आजूबाजूच्या लोकांना म्हणजे आपल्या मुलांना, नवर्‍याला, आईला, आजीला वाईट वाटत असेल , त्रास होत असेल तर आपण जे डाएट करतो आहोत हे चुकीचं समजावं. असं तू खाऊच कसं शकते? एवढ्यानं भूक कशी भागेल? अगं यामुळे तर तू आजारी पडशील अशी वाक्यं आपलं डाएट बघून आपले जवळचे आपल्याला सतत ऐकवत असतील तर आपण जे डाएट फॉलो करतो आहोत ते चुकीचं आहे, फॅड आहे हे समजावं.

Web Title: Is your diet a fact or a fad? Take 4 Rules Test, Stay Safe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.