Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कोरोनात झालेली झीज भरुन काढायची तर कोणता आहार घ्यायचा, हे कसं ठरवणार?

कोरोनात झालेली झीज भरुन काढायची तर कोणता आहार घ्यायचा, हे कसं ठरवणार?

कोरोनाकाळात आणि बरं झाल्यानंतरच्या आहाराबद्दल बद्दल खूप लोक खूप काही बोलत आहेत आणि दुर्दैवाने त्यामधील सगळ्याच गोष्टी ह्या शास्त्रीय पद्धतीवर आधारलेल्या आहेत असं नाही. सगळ्यांना सरसकट एकच आहार चालेल असंही नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 03:22 PM2021-05-12T15:22:06+5:302021-05-12T15:29:04+5:30

कोरोनाकाळात आणि बरं झाल्यानंतरच्या आहाराबद्दल बद्दल खूप लोक खूप काही बोलत आहेत आणि दुर्दैवाने त्यामधील सगळ्याच गोष्टी ह्या शास्त्रीय पद्धतीवर आधारलेल्या आहेत असं नाही. सगळ्यांना सरसकट एकच आहार चालेल असंही नाही.

which diet is useful after Corona infection, how to decide it | कोरोनात झालेली झीज भरुन काढायची तर कोणता आहार घ्यायचा, हे कसं ठरवणार?

कोरोनात झालेली झीज भरुन काढायची तर कोणता आहार घ्यायचा, हे कसं ठरवणार?

Highlightsडायट म्हणजे फॅशन स्टेटमेंट नाही , म्हणजे फक्त वजन कमी करण्यासाठी ,ग्लॅमर साठी हे करु नये, उत्तम तब्येत, उत्तम आहार हे ध्येय असले पाहिजे.

अर्चना रायरीकर

कोरोना रुग्णांनी सध्या हॉस्पिटल्स भरलेले आहेत. अनेक हॉस्पिटल आहारतज्ज्ञ कोविड नॉन कोविड वॉर्डमध्ये जाऊन राऊंड घेत आहेत. आवश्यक तो आहार  रुग्णाला मिळतो आहे की नाही याची काळजी घेणे, घरी गेल्यानंतर देखील आहारामध्ये काय बदल करायला हवा आणि स्वतःची कशी काळजी घ्यावी हे सांगत आहेत. पण आपण सध्या बघतो की आहाराबद्दल, स्पेशली कोविडच्या आहाराबद्दल बद्दल खूप लोक खूप काही  बोलत आहेत आणि दुर्दैवाने त्यामधील सगळ्याच गोष्टी ह्या शास्त्रीय पद्धतीवर आधारलेल्या आहेत असं नाही. 
एक लक्षात घेतलं पाहिजे की बरेचदा यातील ज्या काही गोष्टी आपल्या समोर येतात आणि सांगितल्या जातात त्या जनरल असतात म्हणजे त्या व्यक्ती विशेष अशा नसतात. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा त्याच्या प्रकृतीनुसार किंवा त्याच्या मेडिकल हिस्ट्री नुसार वेगळा असतो, हे सारं गृहीत धरून त्यानं काय आहार घ्यावा हे ठवणं गरजेचं असते.
जनरल गोष्टींवर अगदीच अविश्वास दाखवा असं नाही पण त्या व्यक्तीविशेष नाहीत आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवं. त्याप्रमाणे स्वतःसाठी स्वतःच्या गरजेनुसार आहार तयार करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे .
त्यासाठी जे योग्य प्रशिक्षित आणि अनुभवी आहार तज्ज्ञ आहेत यांची मदत घ्या. 

१.एक म्हणजे कोरोना काळानंतर शरीरातील शक्ती कमी होते. कारण हे एक प्रकारचे इन्फेक्शन आहे बरेचदा मसल लॉस म्हणजेच स्नायूंची झीज झालेली असते त्यामुळे थकवा जाणवतो आणि मग कुठलीतरी प्रोटीन पावडर घेण्याचा कुठून तरी सल्ला मिळतो
पण प्रत्येकाला कुठली प्रोटीन पावडर गरजेचे आहे हे त्याच्या वयानुसार, त्याच्या ऍक्टिव्हिटीनुसार आणि त्याच्या एकंदर खाण्या प्रमाण काय आहे त्यावर ठरते. उदाहरणार्थ तुम्हाला दिवसाला 60 ग्रॅम प्रोटिन ची गरज आहे. तुम्ही तुमच्या आहारातून ऑलरेडी जर 40 ग्रॅम प्रोटीन घेताय तर प्रोटीन पावडर किती घ्यायला पाहिजे म्हणजे? तुम्हाला जेवढे गरजेचे प्रोटीन आहे तेवढेच प्रोटीन मिळतील हे आहारतज्ज्ञ कॅल्क्युलेट करू शकतात.
कारण गरजे पेक्षा जास्त प्रोटीन घेणं देखील चांगले नाही.
२.प्रोटीन सप्लीमेंट चे सुद्धा खूप प्रकार आहेत त्यातील काही वजन वाढवतात .काही जणांचे वजन आधीच जास्त असते आणि त्यामुळे प्रोटीन पावडर घेऊन उगीचच वजन वाढवणे त्यांना फायद्याचे नाही त्यामुळे त्यांना लीन प्रोटीन द्यावे लागते. ज्याचे वजन कमी झाले आहे त्यांना  असे प्रोटीन सप्लीमेंट देऊ शकतो की त्यांना शक्ती मिळेल आणि वजनही वाढेल .
३. काही जणांना शुगर-फ्री प्रोटीन सप्लीमेंट घ्यावे लागते. सध्या मार्केटमध्ये असेही प्रोटीन सप्लीमेंट आहे की ज्यामध्ये प्रोटीन बरोबरच इम्युनिटी वाढवणारे घटक आणि आतड्यातील चांगले जीवजंतू वाढवणारे घटक यांचाही समावेश आहे. जर एकाच प्रॉडक्ट मध्ये तुम्हाला 2-3 अजून काही गोष्टी मिळत असतील तर अजून चांगलं नाही का ?
पण ही माहिती आहार तज्ज्ञांकडे असते. या सप्लीमेंटबद्दल काही क्लिनिकल ट्रायल किंवा स्टडीज देखील झालेले असतात त्याची माहिती देखील त्यांच्याकडे असते. त्यामुळे नक्की कुठली सप्लिमेंट घ्यावी याचा सल्ला ते चांगला देऊ शकतात. 
४. अँटिबायोटिक्स विविध औषधे घेऊन शरीर एका प्रकारे टॉक्सिक झालेल असतात त्यासाठी काय करता येईल की ज्यामुळे त्यांचे  साईड इफेक्ट कमीत कमी होतील हे डायटीशियन सांगू शकतात.
अँटिबायोटिक्स मुळे आतड्यातील चांगले जिवाणू देखील कमी होत असत ते वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठीसुद्धा आपल्याला आहारतज्ज्ञांचा सल्ला घेता येऊ शकतो.
५. दुसरा म्हणजे कोविड झालंय ते बरेचसे लोकं जेव्हा हे होते  तेव्हा ते इतके आजारी अशक्त असू शकतात की त्यांना स्वतः जेवण करणे अवघड होऊन जातं मग त्यांना असे काय सोपे पदार्थ करता येतील जसे की वन डिश मील ज्याच्या मध्ये सगळे पोषक घटक एकदम मिळून जातील किंवा बाहेरून काय मागवता येईल ज्याच्या मधून त्यांना पोषक घटक मिळतील किंवा डबा पुरवत आहेत त्यांना काय सांगता येईल काय सल्ला देता येईल हे काम आहारतज्ज्ञ करू शकतात.

६.  डायट म्हणजे फॅशन स्टेटमेंट नाही , म्हणजे फक्त वजन कमी करण्यासाठी ,ग्लॅमर साठी हे करु नये, उत्तम तब्येत, उत्तम आहार हे ध्येय असले पाहिजे.

(लेखिका आहारतज्ज्ञ आणि सत्व न्यूट्रिशन क्लिनिकच्या संचालक आहेत.)

Web Title: which diet is useful after Corona infection, how to decide it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.