Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > झटपट वजन कमी करायचं तर ‘हे’ ३ पांढरे पदार्थ खाणे बंद करा, डायटिशियन सांगतात सोपा उपाय

झटपट वजन कमी करायचं तर ‘हे’ ३ पांढरे पदार्थ खाणे बंद करा, डायटिशियन सांगतात सोपा उपाय

Stop Eating These 3 Things: जर फार काही करवत नसेल तर फक्त हे ३ पदार्थ खाणे सोडून द्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2025 15:37 IST2025-01-17T15:34:37+5:302025-01-17T15:37:32+5:30

Stop Eating These 3 Things: जर फार काही करवत नसेल तर फक्त हे ३ पदार्थ खाणे सोडून द्या.

Stop Eating These 3 Things | झटपट वजन कमी करायचं तर ‘हे’ ३ पांढरे पदार्थ खाणे बंद करा, डायटिशियन सांगतात सोपा उपाय

झटपट वजन कमी करायचं तर ‘हे’ ३ पांढरे पदार्थ खाणे बंद करा, डायटिशियन सांगतात सोपा उपाय

अनेक जणांचं आयुष्य धावपळीचं असतं. वजन कमी करण्यासाठी वेगळे कष्ट घेणं कठीण होऊन बसतं. काहींना व्यायाम करायचा आळस असते.( Stop Eating These 3 Things) काहींना शारीरिक समस्यांमुळे व्यायाम किंवा डायटिंग करता येत नाही. अशा लोकांसाठी एक उपाय आहे. ज्यामुळे वजन कमी करता येईल. अगदी व्यायाम केला तरी, जि‍भेवर संयम असल्याखेरीज बारीक होणं कठीणच.( Stop Eating These 3 Things) जास्त आहारातील बदल झेपत नसेल तर, हा डाईट प्लॅन करून बघा.  

 थ्री व्हाईटस् इलिमेनेशन नावाचा हा प्लॅन आहे. गुंजन शाऊटस् या युट्यूब चॅनेलवर हा प्लान डायटिशियन गुंजन हिने सांगितला आहे. ती सांगते रोज काही रंगाने पांढरे असलेले पदार्थ आपण खातो. पण ते खाणे बंद करून झटकन वजन कमी करता येते. नक्की काय आहे  थ्री व्हाईटस् इलिमेनेशन प्लॅन. जाणून घ्या.

खालील तीन पदार्थ खाणे बंद करा असा सल्ला गुंजने दिला आहे.( Stop Eating These 3 Things)
१. साखर
साखर खाऊ नका हे तर डॉक्टर सुद्धा सांगतात. गोड पदार्थांमध्ये जेवढ्या कॅलरीज असतात, तेवढ्या कशात नसतात. शरीरासाठी गरजेचे असे काहीच साखरेत नसते. निव्वळ चवीसाठी साखर चांगली. साखरेऐवजी गूळ किंवा नैसर्गिक गोड पदार्थ खा. साखर बंद केल्यावर वजन झटकन खाली घसरेल.

२. मैदा
मैद्यात गरजेचे असे काहीच नाही. मैदा पचायला प्रचंड जड असतो. पोटात मैदा बसतो म्हणजेच त्याचे पचन होत नाही. त्याचे रूपांतर फॅट्समध्ये होते. मैदा व्यवस्थित जिरत नाही त्यामुळे पोटाचे विकार होतात. जंग फूड, स्ट्रीट फूड आजकाल फार खाल्ले जाते. यात प्रचंड मैदा वापरतात. असे अन्न खाणे टाळा.   

३.काही दुग्धजन्य पदार्थ
बरेच जण पौष्टिक म्हणून  दुग्धजन्य पदार्थांचे अति सेवन करतात. दूध पचायला जड असते. बदललेल्या रहाणीमानामुळे शरीराची हालचाल फार होत नाही. असे पदार्थ पचवणे पचनसंस्थेला कठीण जाते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन टाळा असे गुंजन सांगते.  

Web Title: Stop Eating These 3 Things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.