Join us  

पोषण वाडगा : एका वाडग्यात संपूर्ण जेवणही आणि डाएटही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 2:17 PM

हल्ली सगळ्यांना सुटसुटीत हवं असते, विशेषकरून खाणेपिणे. ते तर झटपट हवे मात्र पौष्टिकही हवेच.

ठळक मुद्देचवबदल आणि पोषण या दोन्हीसाठीही उत्तम उपाय आहे.

शुभा प्रभू साटम

पोषण या शब्दाची चर्चा आहेच. पण लॉकडाऊन काळात चारठाव करुन जेवणं, त्यात वर्क फ्रॉम होम, घरीच सगळी कामं याचाही कंटाळा आलेला आहे. त्यात हल्ली सगळ्यांना सुटसुटीत हवं असते, विशेषकरून खाणेपिणे.  ते तर झटपट हवे मात्र पौष्टिकही हवेच. हल्ली नोकरी व्यवसाय शिक्षण यानिमित्त सगळे घाईत असतात, वेळ नसतो आणि त्यामुळं काहीतरी जुजबी खाल्लं जातं, अनेकदा बाहेर किंवा पॅकेज फूड आणलं जाते, पण ना ते खिशाला परवडत ना आरोग्याला,अश्या या घाईत असणाऱ्या पण खाणेपिणे आरोग्य या बाबतीत जागरूक लोकांसाठी आजचा प्रकार. वाडगंभर पोषण. बुध्दा बाऊल म्हणूनही ते आता चर्चेत आहे.एक वाडगा पूर्ण पोषण.एका वाडग्यात अनेक शाकाहारी पदार्थ एकत्र करून ते खाल्ले जातात,तळलेले किंवा फार शिजवलेले पदार्थ नसतात.  धान्य हा मुख्य घटक,नंतर भाज्या नंतर फळे नंतर चवीसाठी काही अशी रचना असते.करायला सोपं आहे.

कसा तयार करणार हा पोषण वाडगा.

ओट्स /शिजवलेला लाल भात/वरी/ज्वारी/नाचणी/कुळीथ(धान्य बेस)चणे ,राजमा,चवळी,मूग,किंचित उकडून, मूग कच्चे चालतीलकोबी,गाजर,पालक,सलाड पाने,लाल मुळा,टोमॅटो,काकडी,रताळी(उकडून),भोपळा,जांभळा कोबी, फ्लॉवर, फरसबी,(आवडते तसे उकडूून कापून)कोणताही सुकामेवा,खजूर,खारीक,अंजीर,मनुका,अक्रोड,(किंचित शेकवून घेतलं तर मस्त लागते,आवडीप्रमाणे तुकडे करून)आंबा,कलिंगड,पपई, केळी, टरबूज,स्ट्रॉबेरी, अवकाडो,सफरचंद, कोणतीही मोसमी फळे,दही/योगुर्ट/मध/दूध,वरून घालायला तीळ,खसखस,अळशी,किंचित भाजून,आपला ओवा किंवा बडीशेप पण चालते.वरील कोणतेही साहित्य कसेही कितीही एकत्र करून खायचे. फक्त जे मूळ धान्य आहे ते मात्र हवेच.मोसम आणि आवडीप्रमाणे तुम्ही काहीही घालू शकता, एका बोल/वाडग्यात पूर्ण पोषणपॉवर नाश्ता.करुन पहा. चवबदल आणि पोषण या दोन्हीसाठीही उत्तम उपाय आहे.

(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्स