Join us

गरबा खेळताना थकवा येऊ नये म्हणून खाण्यापिण्याची ही ३ पथ्यं पाळा, मग नाचा बिनधास्त रात्रभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2023 13:55 IST

How To Improve Energy Level For Dandiya: स्वत:ला कोणताही त्रास न होऊ देता, थकवा न येऊ देता उत्साहात दांडिया- गरबा खेळायच्या असतील तर खाण्यापिण्याची एवढी काळजी घ्याच....

ठळक मुद्देबऱ्याचदा दांडियासाठी तयार होताना आपण नटण्याथटण्याकडे जास्त लक्ष देतो आणि तसंच घाईघाईत उपाशीपोटी दांडिया खेळायला जातो.

आता आपल्या सभोवती नवरात्रीच्या (navratri) दांडियाचे- गरब्याचे (garba) मंडप सजायला सुरूवात झाली आहे. काही जणींची तर दांडियाची (dandiya) प्रॅक्टीसही सुरू झाली असून त्यासाठीची ड्रेपरी आणि दागिने हे देखील निश्चित झाले आहेत. आता फक्त जोरदार दांडिया सुरू होण्याची सगळे वाट पाहात आहेत. पण दांडियाचा जर मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर मात्र दांडिया खेळताना खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याचदा दांडियासाठी तयार होताना आपण नटण्याथटण्याकडे जास्त लक्ष देतो आणि तसंच घाईघाईत उपाशीपोटी दांडिया खेळायला जातो. अशाने मग स्टॅमिना पुरत नाही आणि लवकर थकवा येतो. त्यामुळे नवरात्रीच्या काळात दांडिया खेळताना खाण्यापिण्याची ही पथ्य पाळाच (food that helps to improve energy level)...

 

दांडिया- गरबा खेळताना खाण्यापिण्याची कशी काळजी घ्यावी?

१. दांडियाला जाण्यापुर्वी काय खावे?

दांडिया खेळायला जायचे असेल तर जसे उपाशीपोटी जाऊ नये, तसेच खूप भरपेट खाऊनही जाऊ नये....

गरबा- दांडियासाठी जॅकेट घ्यायचंय? फक्त ३०० रुपयांत घ्या एकापेक्षा एक ट्रेण्डी- स्टायलिश जॅकेट

कारण खूप जास्त खाऊन दांडिया खेळायला लागलात तर अपचनाचा त्रास होईल. ॲसिडीटी वाढेल किंवा पोट दुखायला लागेल. त्यामुळे अगदी प्रमाणशीर खा. शक्य झालं तर डाळ- तांदळाची मऊसूत खिचडी किंवा मग एखादी भाकरी असा हलका आहार घ्या.

२. पाणी भरपूर प्या

दांडिया किंवा गरबा करताना खूप घाम येतो. आपण अक्षरश: घामाघूम होऊन जातो. त्यामुळे त्या काळात डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्या ९ दिवसांत जरा लक्ष ठेवून जास्त पाणी प्या.

पिस्ते खाण्याचे ७ फायदे, हृदयापासून बीपीपर्यंत... सगळंच राहील ठणठणीत

संत्री, मोसंबी अशी फळं खा. त्या फळांमधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे एनर्जी टिकवून ठेवण्यास मदत होते. शिवाय सूप प्यायल्यानेही चांगलाच फायदा होतो. 

 

३. ज्यूस प्या..

दांडिया खेळताना पाण्याची एखादी बाटली तुमच्या आसपास अवश्य असू द्या आणि दर अर्धा ते पाऊण तासाने पाणी प्या.. पाण्याऐवजी लिंबू सरबत, ताक, लस्सी असे प्यायलात तरी चालेल.

बीपी सतत वाढतं? ६ पदार्थ नियमित खा, बीपी राहील नॉर्मल आणि तब्येत ठणठणीत

दांडियाच्या मंडपात बऱ्याच वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल लावलेले असतात. पण त्या स्टॉलमध्ये असलेले मैद्याचे पदार्थ तसेच तेलकट- तुपकट पदार्थ खाणं मात्र कटाक्षाने टाळा. 

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री गरबा २०२३नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३