बीटाचा पाला फेकून देता ? त्या पाल्यातही भरपूर पोषक तत्व असतात, हे घ्या डाएटसाठी परफेक्ट पदार्थ! - Marathi News | Do you throw away beet greens? In fact, it is better to eat beet greens than beet roota! | Latest sakhi News at Lokmat.com
>आहार -विहार > बीटाचा पाला फेकून देता ? त्या पाल्यातही भरपूर पोषक तत्व असतात, हे घ्या डाएटसाठी परफेक्ट पदार्थ!

बीटाचा पाला फेकून देता ? त्या पाल्यातही भरपूर पोषक तत्व असतात, हे घ्या डाएटसाठी परफेक्ट पदार्थ!

बीटापेक्षाही बीटाच्या पाल्यात खूप गुण असतात म्हणून बीटाचा पाला फेकून न देता खायला हवा. बीटाच्या पाल्याची भाजी, सलाड, स्मूदी, पराठे असे विविध प्रकार करता येतात. बीटाच्या पाल्यापासूनचा प्रत्येक प्रकार हा पौष्टिक आणि चविष्ट असतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 07:47 PM2021-04-21T19:47:45+5:302021-04-22T12:35:51+5:30

बीटापेक्षाही बीटाच्या पाल्यात खूप गुण असतात म्हणून बीटाचा पाला फेकून न देता खायला हवा. बीटाच्या पाल्याची भाजी, सलाड, स्मूदी, पराठे असे विविध प्रकार करता येतात. बीटाच्या पाल्यापासूनचा प्रत्येक प्रकार हा पौष्टिक आणि चविष्ट असतो.

Do you throw away beet greens? In fact, it is better to eat beet greens than beet roota! | बीटाचा पाला फेकून देता ? त्या पाल्यातही भरपूर पोषक तत्व असतात, हे घ्या डाएटसाठी परफेक्ट पदार्थ!

बीटाचा पाला फेकून देता ? त्या पाल्यातही भरपूर पोषक तत्व असतात, हे घ्या डाएटसाठी परफेक्ट पदार्थ!

Next
Highlightsएक कप शिजवलेल्या बीटाच्या पाल्यात ६० टक्के पोषणमूल्यं असतात. तसेच बीटाचा पाल्यात फॅटस आणि उष्मांकही कमी असतात.बीटाच्या पाल्यात असलेलं कॅल्शिअम हाडांची ताकद वाढवतं. शिवाय ऑस्टॉपॉरोसिस या आजाराला रोखतं.त्वचा छान ठेवायची असेल तर बीटाचा पाला खायलाच हवा. बीटाच्या पाल्यात असलेल्या क जीवनसत्त्वामुळे आणि शुध्दीकरणाच्या गुणधर्मामुळे तेजस्वी त्वचेसाठी बीटाच्या पाल्याचा उपयोग होतो.

बीट आपण नेहेमीच खातो पण बीटासोबत येणाऱ्या पाल्याचं आपण काय करतो? अनेकजण तर बीट विकत घेताना आधी तो पाला कापून मगच बीट पिशवीत टाकतात? बीटाचा पाला टाकून केवळ बीट खाणं हे शहाणपणाचं लक्षण नाही असं तज्ज्ञ सांगतात. बीटापेक्षाही बीटाच्या पाल्यात खूप गुण असतात म्हणून बीटाचा पाला फेकून न देता खायला हवा. बीटाच्या पाल्याची भाजी, सलाड, स्मूदी, पराठे असे विविध प्रकार करता येतात. बीटाच्या पाल्यापासूनचा प्रत्येक प्रकार हा पौष्टिक आणि चविष्ट असतो.

बीटाच्या पाल्यानं आपल्याला काय मिळतं.
- बीटाच्या पाल्यात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी क जीवनसत्त्वाची गरज असते. एक कप शिजवलेल्या बीटाच्या पाल्यात ६० टक्के पोषणमूल्यं असतात. तसेच बीटाचा पाल्यात फॅटस आणि उष्मांकही कमी असतात.

- बीटाच्या पाल्यात नायट्रेटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं ते रक्त शुध्द ठेवतं, शिवाय रक्त दाब कमी करण्यास मदत करतं. नायट्रेटमूळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते शिवाय हदयाचं कार्यही सूधारतं.

- बीटाच्या पाल्यात असलेलं कॅल्शिअम हाडांची ताकद वाढवतं. शिवाय ऑस्टॉपॉरोसिस या आजाराला रोखतं. शिवाय के जीवनसत्त्व हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. के जीवनसत्त्वं हे आहारातून हाडांना कॅल्शिअम मिळवण्यासाठी बळ देतं. त्यामुळे जे केवळ शाकाहारी आहेत त्यांनी हाडांची ताकद वाढवण्यासाठी आवर्जून बीटाचा पाला खायला हवा असं डॉक्टर सांगतात.

- मानसिक आरोग्य सुधारण्याची ताकद बीटाच्या पाल्यात असते. बीटाच्या पाल्यात बी६ हे जीवनसत्त्वं असतं. बी६ हे जीवनसत्त्वं मूड सूधारण्यासाठी, नैराश्यावर मात करण्यासाठी महत्त्वाचं असतं. शिवाय बीटाच्या पाल्यात असलेल्या के जीवनसत्त्वामुळे अल्झायमर असलेल्या रुग्णास फायदा मिळतो. अल्झायमरची वाढ कमी होते.

- बीटाच्या पाल्यात लोह मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे अ‍ॅनेमियावर मात करण्यासाठी बीटाचा पाला आहारात असण्याला खूप महत्त्व आहे. बीटाच्या पाल्यामुळे लाल रक्त पेशी वाढतात.

- त्वचा छान ठेवायची असेल तर बीटाचा पाला खायलाच हवा. बीटाच्या पाल्यात असलेल्या क जीवनसत्त्वामुळे आणि शुध्दीकरणाच्या गुणधर्मामुळे तेजस्वी त्वचेसाठी बीटाच्या पाल्याचा उपयोग होतो. क जीवनसत्त्वामधे असलेल्या अ‍ॅण्टिऑक्सिडण्टमुळे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोलॅजन घटकाची निर्मिती जास्त प्रमाणात होते. बीटाच्या पाल्यातील तंतूमय घटकांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्याचा उपयोग त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो.

- पचनकार्य सुधारण्याकामी बीटाच्या पाल्याचा उपयोग होतो. तसेच पोटात आवश्यक मित्र जीवाणू तयार करण्याचं काम बीटाच्या पाल्यातील गुणधर्म करतात.

Web Title: Do you throw away beet greens? In fact, it is better to eat beet greens than beet roota!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.