Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उन्हाळ्यात गारेगार सब्जा हवासा वाटतोच, पण तो वजनही कमी करु शकतो हे माहितीये का?

उन्हाळ्यात गारेगार सब्जा हवासा वाटतोच, पण तो वजनही कमी करु शकतो हे माहितीये का?

सब्जा हा आरोग्यास अनेक मार्गांनी लाभदायक आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी तो विशेष प्रभावी मानला जातो. सब्जाला सुपरफूडही म्हटलं जातं. आरोग्य तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी आहारात सब्जाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 06:55 PM2021-04-15T18:55:30+5:302021-04-15T20:35:08+5:30

सब्जा हा आरोग्यास अनेक मार्गांनी लाभदायक आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी तो विशेष प्रभावी मानला जातो. सब्जाला सुपरफूडही म्हटलं जातं. आरोग्य तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी आहारात सब्जाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

The difficult goal of losing weight can be easily achieved with Sabja Seeds.. how? | उन्हाळ्यात गारेगार सब्जा हवासा वाटतोच, पण तो वजनही कमी करु शकतो हे माहितीये का?

उन्हाळ्यात गारेगार सब्जा हवासा वाटतोच, पण तो वजनही कमी करु शकतो हे माहितीये का?

Highlightsसब्जा खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. भूक कमी होते. सब्जामधे अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड असतं. या अ‍ॅसिडचा उपयोग चयापचय क्रियेस चरबी जाळण्यास उदयुक्त करण्यासाठी होतो. पाण्यात भिजवून सब्जाचा वापर हा सर्वात परिणामकारक मानला जातो.

आहारात छोट्या छोट्या गोष्टींचा समावेश केल्यानेही वजन कमी करण्याचं अवघड वाटणारं लक्ष सहज गाठता येतं. उन्हाळ्यात आपण सब्जाचा उपयोग करतो तो थंडपणा मिळण्यासाठी. पण शरीराला थंडावा देणारा सब्जा हा वजन कमी करण्यातही महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आहारतज्ज्ञ वेगवेगळ्या स्वरुपात सब्जा खाण्याचा सल्ला देतात. सब्जा हा आरोग्यास अनेक मार्गांनी लाभदायक आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी तो विशेष प्रभावी मानला जातो. सब्जाला सुपरफूडही म्हटलं जातं. त्यात अ‍ॅण्टिऑक्सिडण्टस असतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात.

सब्जा हा वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो कारण त्यात तंतूमय घटक मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामूळे सब्जा खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. भूक कमी होते. जास्त खाणं होत नाही. सब्जामधे अल्फा लिनोलेनिक अ‍ॅसिड असतं. या अ‍ॅसिडचा उपयोग चयापचय क्रियेस चरबी जाळण्यास उदयुक्त करण्यासाठी होतो. सब्जामधे उष्मांकाची संख्या दोन ते चार एवढीच असली तरी त्यात कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम लोह ही खनिजं आणि अ, बी कॉम्पलेक्स, ई आणि के जीवनसत्त्व असतं. सब्जामधील हे गुणधर्म वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. सब्जाचं सेवन केल्यानं विमनस्कता, भीती या मानसिक आजारांवरही सकारात्मक फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी सब्जाचा उपयोग कसा करावा?

- सब्जाच्या सेवनानं वजन कमी होण्यासोबतच पोटावरची चरबी कमी होते. पाण्यात भिजवून सब्जाचा वापर हा सर्वात परिणामकारक मानला जातो. सब्जाचं बी हे चावून खाण्यास कठीण असतं. पाण्यात भिजवल्यानं ते मऊ आणि पारदर्शक होतं. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दोन चमचे सब्जा बी एक कप गरम पाण्यात पंधरा मिनिटं भिजवावी. गरम पाण्यानं सब्जा बी चांगली फुगते. आणि सब्जामधील पाचक विकर बाहेर पडतात.

- हा भिजवलेला सब्जा केवळ पाण्यासोबतही घेता येतो, सब्जाला त्याची विशिष्ट चव नसल्यानं इतर कोणत्याही पदार्थात तो सहज समाविष्ट होऊ शकतो.

- सब्जा हा मिल्कशेक किंवा स्मूथीज करताना इतर फळं, सिरप आणि मधासारखा त्यात घालता येतो.
- लिंबाचं सरबत करताना भिजवलेला सब्जा टाकल्यास सरबताचं सौंदर्य सोबतच त्याचे गुणधर्मही वाढतात.
- हलवा, पाय किंवा केकमधेही सूक्या मेव्याप्रमाणे सब्जा बी पेरता येतात.
- सूप हे मुळातच आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यात जर सब्जा घातला तर सूपचे गूणधर्मही वाढतात.
- मधल्या काळात तोंडात काही ना काही टाकलं जातंच .  या मधल्या वेळेतल्या खाण्यासाठी कमी उष्मांकाच्या सब्जा बीचं चर्वण करणं हा योग्य पर्याय असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात.

Web Title: The difficult goal of losing weight can be easily achieved with Sabja Seeds.. how?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.