Join us

नवरात्रीचा उपवास करण्याची पाहा ‘ही’ योग्य पद्धत, आरोग्य आणि आध्यात्म दोन्हीही साधेल-वाटेल सुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 18:36 IST

How To Do Navratri Fast?: आरोग्यदायी पद्धतीने नवरात्रीचे उपवास कसे करावे याविषयीची ही खास माहिती...(ayurvedic method of Navratri fast)

ठळक मुद्देनवरात्रीचे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि योग्य पद्धतीने उपवास केले पाहिजेत

नवरात्रीनिमित्त अनेक घरांमध्ये ९ दिवसांचे उपवास केले जातात. काही घरांमध्ये घरातली एक व्यक्ती ते उपवास करते तर काही घरांंमध्ये घरातले सगळेच सदस्य उपवास करतात. उपवास करताना साबुदाणा, बटाटा असे आवडीचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. जोडीला चिप्स आणि इतर तळलेले पदार्थही असतातच. या पदार्थांमुळे मग शरीरातले स्टार्च वाढते. त्यामुळे अंगातली उर्जा कमी होणे, थकवा, ॲसिडीटी, अपचन असे त्रास होऊ लागतात. हे त्रास टाळायचे असतील तर नवरात्रीचे उपवास करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि योग्य पद्धतीने उपवास केले पाहिजेत (ayurvedic method of navratri fast). त्यासाठी नेमकं काय करावं आणि काय टाळावं ते पाहूया..(healthy method of navratri fast)

 

नवरात्रीचे उपवास करण्याची योग्य पद्धत

नवरात्रीचे उपवास जर योग्य पद्धतीने केले तर त्याचा तुमच्या तब्येतीलाही खूप फायदा होऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, याविषयीची माहिती तज्ज्ञांनी lokmat_sakhiand drmohitlodha या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल कसा करावा? घ्या सोपी पद्धत, १० मिनिटांत चवदार तांबुल तयार

१. उपवासादरम्यान नेहमी कोमट पाणी प्या. थंड पाणी प्यायल्याने जठराग्नी मंदावतो. त्याचा पचन क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे उपवास करताना नेहमी कोमट पाणी पिण्यावर भर दिला पाहिजे.

२. उपवास करताना जड पदार्थ खाणं टाळा. पचायला हलके असणारे पदार्थ अधिक प्रमाणात खा.

 

३. दूध आणि तूप एकत्र करून पिणे अतिशय आरोग्यदायी मानले जाते. पचनासाठी तर ते उत्तम आहेच. पण त्याचे इतरही अनेक शारिरीक फायदे आहेत. त्यामुळे उपवासाच्या दिवसांमध्ये गरम दूध पिताना त्यात चमचाभर तूप नक्की घाला.

Navratri 2025: ९ दिवसांचे उपवास करताय? ५ पदार्थ नक्की प्या, थकवा- अशक्तपणा जाणवणार नाही

४. उपवासाला फलाहार घेणे म्हणजेच फळं खाणे खूप चांगले. पण फळं त्यांच्या नॅचरल स्वरुपातच खा. त्यांचा ज्यूस करून पिणे टाळा. कारण तो पचायला जड असतो. शिवाय ज्यूस केल्याने फळांमधलं फायबर नष्ट हाेतं.

५. मखाना, शिंगाडा, राजगिरा हे पदार्थ उपवासादरम्यान खा. पण साबुदाणा, विकत मिळणारे उपवासाचे पॅकफूड, दही उपवासादरम्यान कमी खा.

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४