लग्नसराई सुरु झाली की महिलांच्या फॅशन लिस्टमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मौल्यवान दागिने.(Priyanka Chopra jewelry tips) साडी, लेहेंगा किंवा गाऊन काहीही परिधान केले तरी त्या लूकला रॉयल टच देतात ते म्हणजे सोन्याचे, हिरे किंवा मोत्याचे दागिने.(wedding jewelry care) पण या सगळ्या उत्सवात आणि धावपळीत आपण अनेकदा दागिन्यांच्या काळजीकडे दुर्लक्ष करतो.(gold jewelry maintenance) लग्न किंवा एखाद्या फंक्शनला जाताना आपण अनेकदा परफ्यूम स्प्रे करतो.(diamond cleaning tips)
परफ्यूम मारल्याने शरीरातून घामाची दुर्गंधी येत नाही. पण परफ्यूम मारताना आपण काळजी घेतली नाही तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते.(bridal jewelry care) याबाबत देसी गर्ल बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने एक व्हिडीओ शेअर केला. जो प्रत्येक महिलेसाठी उपयोगी ठरू शकतो.(Priyanka Chopra beauty tips) लाखो रुपयांची ज्वेलरी घालून त्यावर परफ्यूम स्प्रे करत असाल तर ती खराब होऊ शकते.(jewelry shine tricks) दागिने घालण्यापूर्वी काय काळजी घ्यायला हवी जाणून घेऊया.
प्रियंका चोप्रा म्हणते लग्नसराईत कोणतेही दागिने घालण्यापूर्वी परफ्यूम, हेअरस्प्रे आणि इतर सर्व काही लावा. यामुळे दागिन्यांची चमक कमी होणार नाही. आपल्यापैकी अनेकजण संपूर्ण तयारी झाल्यानंतर परफ्यूम स्प्रे करतात. पण यामुळे त्यातील केमिकल घटक दागिने किंवा साडीवर उडण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्याची चमक कमी होऊ शकते. अनेकदा परफ्यूममधले केमिकल दागिन्यांची चमक कमी करतात. यात सोने, प्लॅटेनियम, हिरे किंवा मोती सारख्या दागिन्यांची चमक लगेच कमी होते.
दागिन्यांची काळजी कशी घ्याल?
1. आपण हिरे, मोती, ऑक्साइड आणि सोन्याची ज्वेलरी वेगळी आणि काळजीपूर्वक ठेवायला हवी. दागिने एकत्र ठेवल्याने त्यांचा गुंता होतो तसेच त्यावर ओरखडे पडण्याचा धोका वाढतो. दागिन्यांसाठी मऊ पाउच किंवा बॉक्स वापरा.
2. धातुचे दागिने स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी, साबण आणि मऊ ब्रशचा वापर करा. केमिकल्सचा वापर करुन दागिने स्वच्छ केल्यास त्यांची चमक कमी होऊ शकते.
3. व्यायामापूर्वी अंगठ्या किंवा साखळ्यांचे दागिने काढून ठेवा. घामामुळे दागिन्यांची चमक कमी होऊ शकते.
