ठळक मुद्देपरफेक्ट लूक आणि स्टाईलसाठी थोडं मेण्टेन तर स्वत:ला करावंच लागेल.

सारिका  पुरकर -गुजराथी 

नवीन वर्ष सुरु  झालं की प्रत्येकीला वाटतं, यंदा तरी आपला लूक बदलून टाकू. मस्त रिफ्रेशिंग दिसू. पण नव्याचे नऊ दिवस की पुन्हा सगळा लूक जैसे थे मोडवर येतो. खरंतर छान दिसणं बरेचदा आपल्या मूडवर अवलंबून असतं. पण त्यासोबत जरा मेकअप,हेअरस्टाईल, त्वचेचा पोत यांचीही काळजी घ्यावी लागते. यंदा तुम्हाला असा काही खास लूक हवा असेल तर तुम्ही एक हक्काची मदत घेऊ शकता. आणि स्मार्टच नाही तर सुंदरही दिसू शकता. त्यासाठी करायचं एकच, चक्क तिला काही दिवस फॉलो करा.  
ती कोण? 
धडक गर्ल जान्हवी कपूर. 
 गेल्या काही दिवसात जान्हवीने इन्स्टावर टाकलेल्या तिच्या पोस्ट पाहिल्या तर जान्हवीची एक वेगळी अदा, स्टाईल तर दिसून येतेच शिवाय 2020 या वर्षात करता येतील असे काही मेकअप, स्टाईल्ससाठीही एक गाईडलाईन मिळते. जान्हवीचे लूक नेहमीच क्लासिक, नितळ असतात. तुम्हालाही हे लूक्स हवे असतील तर या टिप्स फॉलो करा. जान्हवीचे हे पाच लूक्स 2020 मध्ये नक्की ट्राय करुन पहावे असे आहेत.

1) मिनिमल सॉफ्ट ग्लॅम 


 हा लूक तुम्ही दररोज ट्राय करु  शकता. कारण हा बेसिक आणि मिनिमल मेकअप लूक म्हणजे कमीत कमी मेकअप लूक आहे. ऑफिससाठी, कॉलेजसाठी तर बिनधास्त कॅरी करु  शकता. या लूकचे वैशिष्ट्य म्हणजे ग्लॉसी लिप्स आणि पापण्यांना दिलेला उठाव. हा मेकअप पटकन तर होतोच शिवाय कमी प्रसाधनं वापरु न होतो.हा मेकअप तुम्हाला आणखी ग्लॅमरस बनवायचा असेल तर चीकबोन्सजवळ आणि डोळ्यांच्या आतील बाजूच्या कॉर्नर्सजवळ हायलाईटरचा वापर करा, बस्स !

 


2) सॉफ्ट टेनिड्रल्स 
 90च्या दशकातील ही हेअरस्टाईल नव्याने लोकप्रिय होतेय. सर्व प्रकारच्या केसांना सूट होणारी, झटपट होणारी म्हणूनच लेझी गर्ल हेअरस्टाईल म्हणून ही स्टाईल ओळखली जाते. जान्हवीने देखील या स्टाईलला पसंती दिलीय. दर्शनी भागात मिडल पार्टिशन, साईड पार्टिशन, विदाऊट पार्टिशन , दोन्ही बाजूला केसांच्या बटा बाजूला काढून नंतर उर्विरत केसांचा उंच बन घातला की टेनिड्रल्सला बाकी काही करावं लागत नाही. ऑफिस, ब्रंच, रात्नीच्या एखाद्या समारंभासाठी तर ही स्टाईल बेस्ट ऑप्शन आहे. दिसायला जरी काहीशी अस्ताव्यस्त असली तरी जान्हवीसारखा क्लासिक लूक मात्न ही स्टाईल मिळवून देते.

3) शिमरी लिड्स 
 जान्हवीचा हा ऑल ग्लॅम लूक वेडिंग रिसेप्शन, पार्टीसाठी एकदम फिट आहे. सॉफ्ट शिमरी आयलिड्ससाठी कॉपर रंगाच्या बेसवर डार्क बेरी ब्राऊन  ह्यू मॅटे आयश्ॉडो लावा. मेकअप सेटिंग स्प्रेचा वापर करु न सेट करा. बोल्ड आयलायनर लावा.  जोडीला लाल रंगाची लिपिस्टक ट्राय करा.

 


4) बोल्ड फुशिया लिप्स 
 खरं तर एरवी बोल्ड लूकसाठी लाल रंगाच्याच लिपिस्टकचा वापर केला जातो. जान्हवीने मात्न नवा ट्रेंड सेट केलाय, तिने लाल रंगाऐवजी फुशिया, हॉट पिंक रंगाची लिपिस्टक ट्राय केलीय. लिपिस्टकची ही शेड तुमच्या मेकअपला सॉफ्ट लूक देईल तसेच लिप्सला फ्रेश पॉप अप लूक देईल.या लूकसाठी भरपूर मस्कारा वापरु न पापण्यांची फडफड आणखी स्टायलिश करता येईल. फ्रेशर्स पार्टीसाठी या लूकला पर्याय नाही.


 

5) सॉफ्ट रोमँटिक वेव्हज 
 केसांचे सॉफ्ट कलर्स तुम्हाला नेहमीच कूल पण सॉफिस्टिकेटेड लूक मिळवून देतात. चेहर्‍याला नवी फ्रेम देखील अ‍ॅड करतात. म्हणूनच एखाद्या डेटसाठी, डिनरसाठी जान्हवीचा हा लूक परफेक्ट ठरतो. रोमँटिक फील हवा असेल तर केसांच्या सॉफ्ट कर्ली वेव्हज कधीही तुम्हाला निराश करीत नाहीत. जान्हवीचा हा लूक तेच सिद्ध करतोय. 

Web Title: Want a new look in the new year? Copy this 5 look by Janhavi Kapoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.