ठळक मुद्देभरमसाठ दागिने न घालता एकच ठसठशीत दागिना घालण्याचा नवा ट्रेण्ड

सारिका पूरकर-गुजराथी

एखादा घरगुती समारंभ, लग्नसोहळा असला की समस्त महिलावर्ग बँकेतील सोन्याचे दागिने काढून आणून ते घालून मिरवत असत. मात्न, सध्या मिनिमम ज्वेलरी म्हणजे कमीत कमी दागिने घालण्याचा ट्रेंड आहे. भरजरी साडी असो, डिझायनर कुर्ती असो किंवा वनपीस असो, कमीत कमी दागिने आणि ते देखील सोन्याचेच नव्हे तर विविध प्रकारचे स्टोन्स, कुंदन, मोती, खडे यांचे अतिशय सुंदर डिझाईन्समधले दागिने वापरण्याकडे महिला तसेच युवतींचा कल वाढलेला आहे.  मोजके पण थोडे वेगळे दागिने घालून ग्रेसफूल लूक ठेवण्यास सार्यांचीच पसंती लाभतेय.  पण हे निवडक, मोजके दागिने घालताना मात्न अत्यंत कल्पकतेने दागिन्यांची निवड करणं गरजेचं आहे.  तरच तुमचा लूक कमी दागिन्यातही चारचौघात खुलून दिसेल.  कशी कराल या निवडक किंवा सिलेक्टिव्ह दागिन्याची. 

ऑक्सडाईज्ड ज्वेलरी 


 दागिन्यांमधील सध्याचा इन असा हा ट्रेंड. ऑक्सडाईज्ड ज्वेलरी म्हटलं की नवरात्नौत्सवातील घागर्‍यायावर घातले जाणारे दागिने एवढाच समज कधीपासून होता. आता मात्न तो गळून पडला असून सोफिस्टिेकेटेड पण तरीही टड्रिशनल लूकसाठी या ज्वेलरीला सर्वाधिक पसंती मिळतेय. अग्गंबाई सासूबाई मराठी मालिकेतील शुभ्रा या नायिकेने घातलेले ऑक्सडाईज्ड कानातले तर जाम फेमस झाले आहे. काश्मिरी तसेच अफगान स्टाईल झुमके म्हणजे डबल लेअरचे मोठे, लांब कानातले तसेच तीन पदरी अफगान झुमके हा प्रकार सर्रास ट्राय केला जातोय.  हे दागिने तुम्ही हातमागाच्या साड्या, कुर्तीज तसेच पलाझो ड्रेसवर घालू शकता. जीन्स-कुर्ती, जीन्स-टॉपवर, स्कर्ट,घागरयावर घालण्यासाठीही मिरर वर्क तसेच तीन लेअर्स असलेला लांब व अफगान स्टाईल नेकलेस मोठ्या प्रमाणात लोकिप्रय होत आहे. काही वेळेस या नेकलेसच्या पेंडेंटला जोडून टसल्स किंवा चेन्स असतात.   अफगान ज्वेलरीत इअररिंग्ज, नेकलेसेस यांचे प्रकार खूपच हिट आहे.

 


 

चोकर नेकलेस 

 पद्मावत सिनेमापासून चोकर नेकलेस हा ट्रेंड हिट झालाय, तो आजही कायम आहे.  गळ्याभोवतीचा, गळ्याला चिकटून  घातला तसेच चौकोनी, आयताकृती असणारा,  कुंदन व मीनाकारी कामातील हा नेकलेस भारदस्त तसेच रॉयल लूक देतो. तसेच चोकरसेटमधील कानातले घातले की बस्स जोडीला काही नाही घातले तरी चालते.  चोकरसेटमधील कानातले स्किप करु न मांग टिकाही घातला जातो.  आलिया भट, करिना कपूर, कंगना राणावत, सोनम कपूर, आदिती राव हैदरी, अनुष्का शर्मा , मलायका अरोरा, जान्हवी कपूर, सोनाक्षी सिन्हा यांनीही लग्नसमारंभामध्ये चोकरलाच पसंती दिलीय.  वन पीस, सिल्क साडी, घागरा तसेच डिझायनर साडीवरही चोकर तितकाच शोभून दिसतो.  सध्या वेस्टर्न आऊटफिटवरही मेटल, चेन, कापडी तसेच स्ट्रेचेबल चोकर घातले जातात.  त्यातही पर्सनलाईज्ड चोकर हा ट्रेंड इन आहे.  

चांदबाली आणि बाहुबली कानातले 

दीपिका पदुकोनने पीकू या चित्नपटात घातलेल्या सोन्याच्या चांदबाली कानातल्यांची क्रेझ आजही कायम आहे.   साडीवर बंद गळ्याचे, बोटनेक ब्लाऊज घातले असेल तर फक्त चांदबाली कानातले घातले तरी तुमचा लूक भारी दिसतो.  लहानपेक्षा मोठ्या आकारातील तसेच मोती व कुंदनकाम असलेली चांदबाली घातली चांदबाली कानातले अनारकली सुट्स, ट्रेंडी पलाझो सुट्स, साड्यांवर घातले  तर फारच छान.  तसेच आता ऑक्सडाईज्ड चांदबालीही घालण्याकडे युवतींचा कल आहे.  त्याचप्रमाणे बाहुबली देवसेना कानातले आजही इन आहेत. तीन चेन आणि  मोत्यांचे झुमके तसेच कानवेल आजही साडी, घागरा, वनपीसवर घालण्याचा ट्रेंड आहे. हे कानातले घालून नेकलेसही नाही घातला तरी लूक छानच वाटतो. तसेच काहीही दागिने न घालता मोठ्या आकारातील झुमके देखील पारंपरिक लूकसाठी बेस्ट ऑप्शन आहे. 
भरमसाठ दागिने न घालता वर नमूद केलेले ज्वेलरी प्रकार जरी ट्राय केले तरीही तुम्हाला भरपूर लाईक्स मिळतील, याची खात्नी आहे. 

Web Title: try Tejashri pradhan style oxidize jhumkas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.