Toilet: ek premkatha- why women are still find it difficult to use toilet in villages. | टॉयलेट : एक प्रेमकथा - यासिनेमासारखेच वास्तव अजूनही खेडय़ापाडय़ात महिलांच्या वाटय़ाला येतंय का?
टॉयलेट : एक प्रेमकथा - यासिनेमासारखेच वास्तव अजूनही खेडय़ापाडय़ात महिलांच्या वाटय़ाला येतंय का?

ठळक मुद्देजनजागृती आणि स्वच्छतेचं मोल याविषयी अजूनही बरंच काम बाकी आहे.

-शिल्पा दातार -जोशी

मध्यंतरी वाचनात एक बातमी आली- कुत्र्याचं तोंड वाघासारखं रंगवल्यामुळे गावकरी कुत्र्यालाच वाघ समजले आणि गाव हगणदारीमुक्त झालं.
‘‘वाघ आला..’ ही अमिताभ बच्चनची हाक पाहून उघड्यावर शौचाला जाणारे गावकरी पुन्हा सार्वजनिक शौचालयांकडं वळतात, ही जाहिरात नक्कीच स्तुत्य आहे; पण जाहिरात आणि वस्तुस्थिती यात काय फरक आहे?
‘‘ताई, पहाटे अंधारातच परसाकडे जावं लागतं. उजाडल्यावर जाता येत नाही. शौचासारख्या नैसर्गिक विधी दाबून ठेवाव्या लागतात. पाळीच्या दिवसांत तर उघड्यावर जाणं ही कुचंबणाच! पण काय करता?’’
वाघाची भीती दाखवली किंवा स्वस्तात शौचालयांचं अमिष दाखवलं तरी अनेक भागांत शौचालयं न वापरण्याचं कारण होतं किंवा आहे, पाण्याचा अभाव.  
गावामध्ये समृद्ध शेती, भाताच्या नवीन जाती लावलेल्या पण एका ठिकाणी निर्मल ग्राम योजनेअंतर्गत बांधल्या गेलेल्या शौचालयात धान्याची पोती दिसली. 
‘‘तुम्ही हे वापरत नाही का?’’ असं विचारल्यावर उत्तर आलं,
‘‘आमच्या समोर धरण आहे, पण गावात पाणी नाही म्हणून आम्ही ते गोडाऊन म्हणून वापरतो.’’ 
तर काही ठिकाणी या शौचालयांचं परिवर्तन किराणा मालाच्या दुकानात झालेलंही दिसलं. 
ग्रामीण भागात काही ठिकाणी तसंच शहरांत गरीब वस्त्यांमधील भारत अजून ‘स्वच्छ’ झालेला नाही. लोकांचं अज्ञान याबरोबरच याची अनेक कारणं आहेत. ती म्हणजे गरिबी, पाण्याचा अभाव, लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालयं उपलब्ध नसणे अशी अनेक कारणं यामागे आहेत.

सुमारे 8 वर्षांपूर्वीची ही परिस्थिती आजही अनेक ठिकाणी दिसते आहे. केंद्र सरकारची आधीची निर्मल भारत योजना आणि नंतरची स्वच्छ भारत अभियान याचा उपयोग अजूनही शंभर टक्के झालेला दिसत नाही, असं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या सर्वेक्षणात आढळलं आहे. स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश पूर्ण सफल झाला नसून केवळ 71  टक्के घरांमध्येच शौचालयं आहेत. जुलै ते डिसेंबर 2018 या काळात केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील 56.6 टक्के ग्रामीण घरांत तर 91.2 टक्के शहरी घरांमध्येच शौचालयं आहेत. सांख्यिकी व कार्यक्र म मंत्नालयाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि घरांची स्थिती याविषयी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (एनएसएस)ने 76 व्यांदा तपासणी केली होती. यात शौचालयांच्या वापरावर आणि ते न वापरण्यामागील कारणांवरीह प्रश्न उपस्थित केले. स्वच्छता विभाग आकडेवारी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्नालयानं संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की एनएसएसच्या अहवालातील निकाल काही मर्यादा व विसंगतींमुळे भारतातील स्वच्छता स्थितीबाबत निष्कर्ष काढण्यासाठी आपण वापरू शकत नाही. 
या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की शौचालयांची उपलब्धता असूनही, अनेक घरांमध्ये त्यांचा नियमित वापर होत नाही.  ‘फ्लश टू सेप्टिक टँक’ प्रणाली वापरली. शौचालयांच्या बांधकामामध्ये शौचालयांना पाणी आणि वीज पुरवणं यासारख्या बाबींचा समावेश नाही, ज्यामुळे लोक त्याचा वापरच करत नाहीत. पाण्याअभावी अस्वच्छ शौचालयांचा वापर होत नाही. 
 शौचालयांची देखभाल आण िपुढाकार याबद्दल जनजागृतीमध्ये मात्न सरकार कमी पडत आहे. ग्रामीण भागातील बर्याच कुटुंबांमध्ये केवळ महिलांनाच शौचालयं उपलब्ध आहेत, कारण शौचालय स्वच्छ करण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते आणि दूरवरून पाणी आणणं सोपं नसतं. त्यामुळं उघड्यावर शौचास जाण्यास भाग पाडते.
 शौचालयाचा वापर केला नाही, यामध्ये पाण्याची उपलब्धता नसणे हे त्याचं कारण असल्याचं अहवालात म्हटलं आहे.  उत्तर प्रदेश आणि ओडिशामधील निम्म्या ग्रामीण कुटुंबांना शौचालयाची सुविधा नव्हती.  
त्यामुळे हे सारे प्रश्न आजही गंभीर आहेत.
 

Web Title: Toilet: ek premkatha- why women are still find it difficult to use toilet in villages.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.