इंटरनेट हे एक असं मायाजाल आहे, जिथे कधी काय व्हायरल होईल आणि कोणाचं नशीब उघडेल, याचा नेम कोणालाच लावता येत नाही. कधी एखादं साधं गाणं, तर कधी कोणाचे अतरंगी हावभाव; कधी एखादा घरगुती 'जुगाड', तर कधी एखादी साधी चूक... सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मवर कोणती गोष्ट कधी 'ट्रेंड' बनेल, हे सांगणं अशक्य आहे. काही सेकंदांचा व्हिडिओ तुम्हाला जगभरात व्हायरल करु शकतो. म्हणूनच म्हणतात ना, इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही! अशाच एका वाढदिवसाच्या केकचा खास किस्सा सध्या इंटरनेटवर व्हायरल होऊन धुमाकूळ घालत आहे. इंटरनेटवरील सध्याच्या व्हायरल व्हिडीओपैकी एका मुलीच्या वाढदिवसाचा केक चर्चेचा विषय ठरला आहे(zomato birthday cake viral after delivered with an unexpected funny message).
तुम्हाला वाटत असेल की केकच्या डिझाइनमुळे तो व्हायरल झाला आहे, तर तसे मुळीच नाही. जेव्हा डिलिव्हरी (hilarious cake order instruction fail) बॉयने हा केक मुलीच्या हातात दिला, तेव्हा केकवर लिहिलेला मेसेज पाहून सर्वजण थक्क झाले. हा मेसेज इतका मजेशीर होता की महिलेने तो सोशल मिडियावर शेअर केला आणि बघता बघता तो व्हायरल झाला. केकवर काय लिहिले होते, हे वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही...
नेमकं असं घडलं तरी काय ?
एका महिलेने तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन केक ऑर्डर केला होता. केक ऑर्डर करताना तिने काही सूचना (Instructions) दिल्या होत्या. विशेष म्हणजे, ही सूचना बेकरीमधील कर्मचाऱ्यासाठी नसून ती डिलिव्हरी बॉयसाठी होती.
महिलेने सुरक्षेच्या कारणास्तव किंवा सोयीसाठी डिलिव्हरी बॉयला निरोप दिला होता की, केक सोसायटीच्या मुख्य गेटवर असलेल्या वॉचमनकडे देऊन जा. तिने इंग्रजीत लिहिले होते : ‘Leave it at the Security Check Center’
"नको रे बाबा"...हॉटेलमध्ये एकटे बसायची भीती वाटते? ‘सोलो डायनिंग फोबिया’ म्हणजे आहे तरी काय...
बाबा, माझा ११ वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे! मुलीचं अफेअर कळताच वडिलांनी केलं असं काही की...
बेकरीमधील कर्मचाऱ्याचा असा गैरसमज झाला की, हे वाक्य केकवर लिहायचा मेसेज (Birthday Message) आहे. त्याने 'हॅप्पी बर्थडे' लिहिण्याऐवजी केकवर हुबेहूब तोच मेसेज लिहिला जो महिलेने डिलिव्हरी बॉयसाठी मेसेज दिला होता. जेव्हा मैत्रिणीने केकचा बॉक्स उघडला, तेव्हा त्यावर लिहिले होते: "LEAVE AT SECURITY"
हा केक पाहून दोन्ही मैत्रिणींना हसू आवरले नाही. त्यांनी हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आणि लोकांनी त्यावर मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली. नेटकरी म्हणले, डिलिव्हरी इन्स्ट्रक्शन आणि बर्थडे मेसेजमध्ये फरक ओळखायला शिका! तर कुणी म्हटले, "बेकरीवाल्याने आपले काम अतिशय प्रामाणिकपणे केले आहे."
Web Summary : A woman ordered a birthday cake online, instructing the delivery to leave it at the security check. The baker mistakenly printed 'Leave at Security' on the cake, resulting in hilarious social media buzz.
Web Summary : एक महिला ने ऑनलाइन जन्मदिन का केक ऑर्डर किया, जिसमें डिलीवरी को सुरक्षा जांच पर छोड़ने का निर्देश दिया गया था। बेकरी वाले ने गलती से केक पर 'सुरक्षा पर छोड़ दो' छाप दिया, जिसके परिणामस्वरूप सोशल मीडिया पर हंसी-मजाक हुआ।